पुढारी ऑनलाईन डेस्क - जय भीमनंतरही साऊथ सुपरस्टार सूर्याची चलती आहे. आता त्याला प्रसिद्ध फ्रेंचाईजी धूम ४ चित्रपटाच्या विलेनसाठी सूर्याला विचारणा झाल्याचे समजते. रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी खलनायकाच्या भूमिकेसाठी तमिळ सुपरस्टार सूर्याला ॲप्रोच केल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, अभिषेक बच्चनच्या व्हायरल फोटोंनी धूम ४ च्या चर्चेने अधिक गती पकडली आहे.
एक रिपोर्टनुसार, धूम-४ साठी निर्माते तमिळ अभिनेता सूर्याशी बातचीत करत असल्याची माहिती समोर आलीय. सूर्या निगेटिव्ह भूमिकेत असेल. चित्रपटाची स्टार कास्ट आणि क्रू समवेत रिलीज डेट सारखी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जर सूर्याने धूम-४ साठी होकार दिला तर त्याच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज असेल.
अक्षय कुमार - सुधा कोंगरा प्रसाद यांच्या ‘सरफिरा’ चित्रपटामध्ये सूर्या कॅमियो रोल साकारताना दिसणार आहे. मागील काही वेळेत धूम-४ विषयी वृत्त समोर आले होते. माहितीनुसार, YRF धूम फ्रेंचायजीला पुढे नेण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. धूम सीरीजचा मागील चित्रपट २०१३ रोजी रिलीज झाला होता. यामध्ये आमिर खान निगेटिव्ह भूमिकेत होता. कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती.