सूरज चव्हाणने जिंकला  instagram
मनोरंजन

माणूस म्हणून कसा आहे Suraj Chavan? लहानपणीच हरपलं होतं आई-वडिलांचं छत्र

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी सीझन ५ च्या ग्रँड फिनाले पूर्वीच सूरज चव्हाणचं नाव विजेता म्हणून प्रेक्षकांनी ठरवलं होतं. अखेर बिग बॉसचा निकाल लागला आणि सूरज चव्हाणने या सीझन ट्रॉफी आपल्या नावे केली. अतिशय कष्टातून, मेहनतीतून सूरज चव्हाणने इथवर मजल मारली. आई-वडिलांचं छत्र नसतानाही सूरजने बिग बॉस मराठी ५ वर आपल्या नावीच मोहोर उमटवली. जाणून घेऊया त्याच्याबद्दल...

सूरज चव्हाण मूळचा बारामतीचा

सूरज चव्हाण मूळचा पुण्यातील बारामती तालुक्यातील मुडवे गावचा आहे. सूरजला पाच बहिणी आहेत. बालपणीच त्यांच्या आई-वडिलांचं छत्र हरपलं होतं. तो फक्त १० वर्षांचा होता, त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले. याचा धक्का आईला बसला. तीदेखील आजारी पडली आणि आईचेही निधन झाले. त्याची आत्या आणि मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला. घरची परिस्थितीमुळे हलाखीची होती. त्यामुले त्याला केवळ ८ वी पर्यंत शिकता आलं. जे काम मिळेल ते तो करू लागला.

सोशल मीडियावर व्हायरल झाले सूरजचे रिल्स

सोशल मीडियाच्या जमान्यात सूरजनेदेखील आपले बस्तान बसवले. तो सोशल मीडियावर छोटे-मोठे व्हिडिओ करू लागला. टिकटॉकला परवानगी असताना त्याने टिकटॉकवरून व्हिडिओ सुरु केले. नंतर इन्स्टाग्रामवर तो रिल्स करू लागला. अनेक जण त्याला रंगरुपासवरून हिणवू लागले होते. पण, सूरजने स्वत:ला सिद्ध करून टीका करणाऱ्यांना चपराक मारली आहे.

इन्स्टाग्रामवरुनही त्यानं चाहत्यांचं मनोरंजन सुरू ठेवलं. इन्स्टाग्रामवर आजच्या घडीला त्याचे तब्बल 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

या खास शब्दांमुळे व्हायरल झाले सूरज चव्हाणचे रिल्स

'बुक्कीत टेंगूळ', 'गुलीगत धोका', 'झापुक झुपूक' असे शब्द जेव्हा ऑनलाईन व्हायरल झाले, तेव्हा नेटकऱ्यांमध्ये त्यांचे नाव चांगले पसरले. दरम्यान, त्याला बिग बॉस मराठीची ऑफरही मिळाली आणि त्याने ती स्वीकारली.

उपविजेता ठरला अभिजीत सावंत

ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत ही दोन नावे समोर होती. रितेशने सूरजला विजयी घोषित केलं. तर अभिजित सावंत उपविजेता ठरला.

सूरज चव्हाणला काय मिळाले बक्षीस?

आपला गोलीगत खेळ दाखवत प्रत्येक आव्हानाला चीत करणारा सूरज चव्हाण विजेता ठरला. सूरज चव्हाणला बिग बॉस सीजन ५ची ट्राफी, १४ लाख, ६० हजार रुपये रक्कम मिळाली. बिग बॉसच्या घरामध्ये कुणाचेही मन न दुखावणारा सूरजने अल्पावधीत सदस्यांना आपलं केलं. सूरजनेदेखील अनेकवेळा किस्से सांगताना आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले होते. होस्ट रितेश देशमुखनेही त्याला वेळोवेळी सल्ले, सूचना देत हिनधास्त खेळण्यासाठी सांगितले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT