Janhvi Killekar met Suraj Chavan new born Baby and Sanjana  Pudhari photo
मनोरंजन

Suraj Chavan Baby |'इतनी खुशी..' आत्याबाई जान्हवी किल्लेकर पोहोचली रुग्णालयात, सुरजच्या बाळाला कुशीत घेऊन कुरवाळले (Video)

Suraj Chavan Baby |'इतनी खुशी..' आत्याबाई जान्हवी किल्लेकर पोहोचली रुग्णालयात, सुरजच्या बाळाला कुशीत घेऊन कुरवाळले (Video)

पुढारी वृत्तसेवा

सूरज चव्हाणच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. या खास क्षणी जान्हवी किल्लेकरने रुग्णालयात पोहोचून बाळाची भेट घेतली. तिने बाळाला कुशीत घेत प्रेमाने कुरवाळले आणि या क्षणाचा आनंद व्यक्त केला. जान्हवीचा हा प्रेमळ अंदाज चाहत्यांना विशेष भावला असून सोशल मीडियावर या भेटीची चर्चा रंगली आहे.

‘झापूक झुपूक’मधून लोकप्रिय झालेला आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या आयुष्यात सध्या सर्वात खास क्षण आहे. सूरज आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. जन्माष्टमीच्या शुभदिनी सूरज बाबा झाला आहे. सूरजला कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यावर आणि संजनावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दरम्यान, मुलीच्या जन्मानंतर रुग्णालयातील सूरजचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सूरजच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर केला असून, त्यात बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि चाहत्यांची गर्दी झाल्याचं दिसत आहे. गर्दीतून वाट काढत सूरज पत्नी संजना आणि नवजात बाळाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला. मात्र, या व्हिडीओमध्ये सूरजची सेलिब्रिटी बहीण जान्हवी किल्लेकर कुठेच दिसली नाही.

बाळाला भेटताच जान्हवी किल्लेकर झाली भावूक

मात्र, आता जान्हवीने एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये जान्हवी रुग्णानयात आई संजना आणि बाळाला भेटण्यासाठी गेलेली दिसते. यावेळी चिमुकलीला पाहून जान्हवी काहीशी भावूक झाल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं.

जान्हवीने शेअर केली चिमुकल्या परीची पहिली झलक

जान्हवी किल्लेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती खूप आनंदात दिसते. गाडीतून उतरल्यानंतर जान्हवी घाईघाईने सूरज आणि संजनाचं बाळ असलेल्या वॉर्डच्या दिशेने जाते. तिथे तिची संजनासोबत भेट होते. दोघी एकमेकींना घट्ट आलिंगन देतात. त्यानंतर जान्हवी बाळाला कुशीत घेते. लाड करते. या खास क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडयावर व्हायरल झालेला दिसतो.

जान्हवीने हा व्हिडीओ शेअर करताना एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. आमची छोटी राजकुमारी आली आहे! माझं अभिनंदन....... (आत्याबाई). यासोबत तिने क्वीन मुकूट आणि एविल आयची इमोजी शेअर केलाय.

डोहाळे जेवणाची जबाबदारीही जान्हवीने घेतली होती

सूरज चव्हाण आणि संजना यांचं लग्न डिसेंबर २०२५ मध्ये झालं होतं. काही काळापूर्वी सूरज बाबा होणार असल्याचे समोर आले. जान्हवीने संजनाची ओटी भरणीचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्यानंतर तिचं थाटामाटात डोहाळे जेवणही पार पाडलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT