रणवीर अलाहबादियाला शो सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली  file photo
मनोरंजन

रणवीर अलाहबादियाला दिलासा, 'या' अटींवर मिळाली शो सुरु ठेवण्याची सूट

Ranveer Allahbadia | रणवीर अलाहबादियाला दिलासा, 'या' अटींवर मिळाली शो सुरु ठेवण्याची सूट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - पॉडकास्टर, यु-ट्यूबर रणवीर अलाहबादियाला दिलासा मिळाला आहे. त्याला त्याचा शो ऑन एयर करण्याची परवानगी दिलीय. कॉमेडियन, यूट्यूबर समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लॅटेंट’मध्ये अश्लील कॉमेंट केल्याने रणवीर अडचणीत सापडला होता. त्याच्यावर अनेक बंधने लावण्यात होती. आता त्याला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून काही अटींवर शो सुरु ठेवण्यास परवानगी मिळालीय.

कोर्टाने 'द रणवीर शो' को जारी ठेवण्याची परवानगी दिलीय. मीडिया रिपोर्टनुसार, कोर्टाने सांगितेल आहे की, शो पब्लिश करताना वेळ, मर्यादा पाळाव्यात. रणवीरला एक अंडरटेकिंग द्यायला हवे, ज्यामध्ये हे निश्चित असणं गरजेचं आहे की, त्याच्या शोमध्ये नैतिकतेचे पालन करण्यात आले आहे. जेणेकरून सर्व वयोगताली प्रेक्षक हा शो पाहू शकतील. २८० लोकांची उपजीविका या शोशी संबंधित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT