Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Teaser out now
मुंबई : रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीजर आज २९ ऑगस्ट रोजी रिलीज केला जाईल. यामध्ये वरुण धवन - जान्हवी कपूर सोबत सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ यांची अनोखी लवह स्टोरीची झलक दाखवण्यात येईल. टीजर रिलीज होताच नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा पाऊस पाडलाय.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' का टीजर शेयर करत धर्मा प्रोडक्सनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलंय, 'चार लोग, दो दिल तोड़ने वाले, एक शादी. चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीजर रिलीज झाला. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.' वरुणची कॉमेडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. तर जान्हवी काही खास कमाल दाखवू शकली नाही. दरम्यान, सान्या आणि रोहितच्या स्क्रीन प्रेजेन्सने सर्वांचे लक्ष वेधले.
चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर रिलीज होताच युजर्सनी कॉमेंट्सचा पाऊस पाडायला सुरुवात केलीय. अनेक लोकांनी वरुण-जान्हवीची केमिस्ट्री फार खास वाटली नसल्याचे म्हटले आहे. कहींनी तर सान्या मल्होत्राने छोटीशी भूमिका साकारल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर कांहींनी म्हटलं की, सान्या आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत असते तर चांगलं झालं असतं. एका युजरने लिहिलं, 'या टीजरमध्ये जान्हवी काही खास करत नाही. टीजरमध्ये केवळ सान्या आणि रोहितनेच लक्ष वेधलं आहे.'