मनोरंजन

IFFSA कॅनडा येथे सनी लिओनीच्या ‘केनेडी’चं होणार खास स्क्रिनिंग

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कान्स येथील मिडनाईट स्क्रिनिंगमध्ये प्रीमियर झाल्यापासून सनी लिओनीच्या केनेडी या चित्रपटाच जगभरातून कौतुक होत आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हल, दक्षिण कोरियाचा बुकियन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हल (BIFAN), आणि Neuchatel इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म (NIFFF) या तीन यशस्वी स्क्रीनिंगनंतर आता केनेडी कॅनडा मधल्या दक्षिण आशियाचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (IFFSA) मध्ये पोहोचला आहे.

IFFSA घोषणेने सिनेप्रेमींना आता सनीच्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटातील अभिनेत्रीची उल्लेखनीय कामगिरी बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तिच्या चाहत्यांना सनी लिओनीचे "चार्ली" हे अनोखं पात्र बघण्याची संधी मिळणार आहे.
या चित्रपट महोत्सवाची ही बारावी आवृत्ती असून १२ ते २२ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.

सनीचे चाहते केनेडीच्या भारतात रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. सनी आता नवीन काय करणार हे बघणे देखील तितकेच उत्सुकतेच ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT