मनोरंजन

Cannes 2023 : सनी लिओनीचा फर्स्ट लूक आऊट, ग्रीन सॅटिन ड्रेसमध्ये अफलातून पोज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने कान्स २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. (Cannes 2023  ) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत तिने इव्हेंटमध्ये सर्वांची मने जिंकली. तिच्या पहिल्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. बॉलीवूडच्या विश्वात सनी लिओनीने स्वत:च वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Cannes 2023 )

सनी लिओनीचा फर्स्ट लुक मधून तिचा अतूट आत्मविश्वास रेड कार्पेट वर दिसतो. तिने डिझायनर मारिया कोखियाचा मनमोहक वन-शोल्डर मॉस ग्रीन सॅटिन ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये तिच्या मिड्रिफवर स्ट्रॅटेजिक कट अफलातून दिसतोय.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की सनी लिओनचा चित्रपट "केनेडी" कान्स चित्रपट महोत्सवात मध्यरात्रीच्या प्रतिष्ठित प्रदर्शनासाठी निवडला गेला आहे, ज्यामुळे हा सन्मान मिळवणारा हा एकमेव भारतीय चित्रपट बनला आहे. सनी लिओनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करतेय आणि जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर छाप पाडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT