मनोरंजन

Sukesh Chandrashekhar : सुकेशचे पुन्‍हा जॅकलिनला पत्र, “आपण लवकरच एकमेकांसोबत असू…”

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar)  हा तुरुंगात आहे. या प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez)देखील नाव गाेवले गेले आहे. सुकेश आणि जॅकलिनचे नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुकेश एका पत्रावरुन पुन्हा चर्चेत आला आहे.

सुकेशने पत्रात लिहिले आहे की, 'जॅकलीन, दोहा शो दरम्यान तू खूप सुंदर दिसत होतीस, तुझ्यापेक्षा दुसरे कोणीच सुंदर नाही. उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे. या काळात मी प्रथमच नऊ दिवस उपवास करणार आहे. आपण लवकरच एकमेकांसोबत असू, काहीही झाले तरीही नेहमी एकत्रच राहू."

जॅकलिनचे स्वप्न करण्याबाबतचे सुकेशचे जुने पत्र

यापूर्वी देखील सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहिलेलं होते. हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल  झाले होते.  (Jacqueline Fernandez) त्याने आपल्या पत्रात दावा केला होता की, तो बंगळुरुमध्ये जनावरांसाठी (कुत्री, मांजर आणि घोड्यांसाठी) एका इंटरनॅशनल लेवलचे सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल बनवत आहे. हे हॉस्पिटल २५ हजार स्क्वेअर फूटमध्ये असून बजेट २५ कोटी रुपये आहे. सुकेशने पत्रामध्ये म्हटलंय की,  हे  सर्व केवळ जॅकलीन फर्नांडिससाठी करणार आहे. (Jacqueline Fernandez)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT