पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. ही शॉर्टफिल्म १२ मे रोजी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित होणार आहे. नुकताच या शॉर्टफिल्मचा टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
या शॉर्टफिल्ममध्ये अनिरुद्ध देवधर आणि गंगुबाई फेम सलोनी दैनी हे पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मोनिका धारणकर यांनी लेखन केलं आहे. वैभव पंडीत यांचं दिग्दर्शन आहे.