stree-2 Stree 2 Box office collection
मनोरंजन

Stree 2 : श्रद्धाच्या 'स्त्री-२'नं कमावला ५४७.९५ कोटींचा गल्ला; 'अॅनिमल'ला टाकलं मागे

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत असलेल्या 'स्त्री-२' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरू आहे. चित्रपटगृहात गेल्या एक महिन्यापासून हा सिनेमा टिकून आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३९ दिवस पूर्ण झाले आहेत. या वर्षातील हा सर्वांत लोकप्रिय ठरलेला हा सिनेमा आहे. स्त्री-२' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ५४७.९५ कोटी रुपयांची बक्कल कमाई केली आहे.

शनिवारी या सिनेमानं ५.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. शुक्रवारी 'स्त्री-२' या सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी बाय वन- गेट बन ही ऑफर दिली होती, त्याचा फायदा होतानाचा दिसत आहे. लवकरच हा चित्रपट ५५० कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण करेल, असा अंदाव व्यक्त केला जात आहे. 'स्त्री-२' या सिनेमानं १९ दिवसांत ५०८ कोटी रुपयांची कमाई करीत रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या चित्रपटाला मागे टाकलं होतं. 'अॅनिमल' या चित्रपटानं ५०५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

'स्त्री-२' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ५११ कोटींचा गल्ला जमवणाऱ्या बाहुबली-२: द कनक्लुजन चित्रपटालाही मागे टाकलं. शाहरूख खानच्या 'पठाण या चित्रपटानं ५२४.५३ कोटींची कमाई केली होती, तर सनी देओलण्या 'गदर-२' या सिनेमानं ५२५ कोटींची कमाई केली होती, या दोन बड्या चित्रपटांनाही 'स्त्री- २ या सिनेमानं मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT