वो स्त्री है ! कुछ भी कर सकती है... हे चेहऱ्यावर भीतीचे हावभाव आणून सांगणारे पंकज त्रिपाठी सगळ्यांनाच आठवत असतील. आता मागच्या सिनेमापेक्षाही पुन्हा एकदा हसवत हसवत घाबरवण्यासाठी स्त्री 2 सज्ज झाला आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'स्त्री 2’ ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी गदर 2 च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. बुधवारी काही निवडक ठिकाणी स्त्री 2 प्रदर्शित झाला. तर गुरुवारी तो सगळीकडे प्रदर्शित झाला. या सिनेमाने या दोन्ही दिवसात 54.35 कोटी कमावले आहेत. अमर कौशिक यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. त्याने हृतिक - दीपिकाच्या 'फायटर' ला मागे टाकले आहे. फायटरने पहिल्याच दिवशी 24.6 कोटींचा गल्ला जमवला होता.
स्त्री सोबत जॉन अब्राहमचा 'वेदा' आणि अक्षय कुमारचा 'खेल खेल मे' ही रिलीज झाला आहे. या दोन पेक्षा पहिल्या दिवशी स्त्री 2 ला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिल्याचे दिसून येत आहे. दिनेश विजन यांच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा हा सिक्वेल आहे. यापूर्वी स्त्री ने ही चांगला गल्ला जमवत प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती.