श्रद्धा कपूरच्या स्त्री २ ने १५ व्या दिवशी किती कमाई केली, पाहुया  Instagram
मनोरंजन

Stree 2 BO Collection - बॉक्स ऑफिसवर 'स्त्री २' ने 'रॉकी भाई' च्या केजीएफचा रेकॉर्ड

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'स्त्री २' ने दोन आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आज २९ ऑगस्ट रोजी स्त्री २ १५ व्या दिवशी किती कमाई केली आहे पाहुया. या दोन आठवड्यात स्त्री २ ने स्टार यशचा साऊथ चित्रपट केजीएफ २ च्या कमाईचा रेकॉर्ड तोडला आहे.

स्त्री २ चे १४ व्या दिवसांचा कमाईचा गल्ला

रिपोर्टनुसार, 'स्त्री 2' ने बॉक्स ऑफिसवर १३ व्या दिवशी ११.७५ कोटी रुपये आणि १४ व्या दिवशी ९.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. केजीफ २ ने हिंदीमध्ये ४३४.७० कोटी रुपये आणि स्त्री २ ने ४३३ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. स्त्री २ ने वर्ल्डवाईड ५८९ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. घरेलू बॉक्स ऑफिसवर ग्रॉस कलेक्शन ४९८ कोटी रुपये आणि स्त्री २ च्या ओवरसीजमध्ये ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन ९१ कोटी रुपये झाले आहे.

स्त्री २ हॉरर कॉमेडी चित्रपट अमर कौशिकने दिग्दर्शित केले आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुरानाने दमदार भूमिका साकारल्या आहेत. स्त्री २ मध्ये अक्षय कुमार आणि वरुण धवनच्या कॅमियोनेदेखीस खूप धमाल केली आहे. चित्रपट स्त्री २ च्या यशानंतर आता स्त्री ३ वर काम सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT