Stree 2 - पाचव्या दिवशी इतक्या कोटींचा गल्ला झाला  Instagram
मनोरंजन

Stree 2 ची चलती कायम, पाचव्या दिवशी इतक्या कोटींचा गल्ला

स्त्री २ - श्रद्धा कपूर-राजुमार रावच्या अभिनयाची चालली जादू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - निर्माता दिनेश विजान आणि दिग्दर्शक अमर कौशिक निर्मित चित्रपट स्त्री २ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यासाठी तयार आहेत. रिलीजच्या पहिल्या दिवसात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हॉरर कॉमेडी चित्रपटाने जबरदस्त प्रदर्शन केले.

पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनचे लेटेस्ट आकडे समोर आले. रक्षाबंधनच्या औचित्याने या कमाईत घट झालेली दिसली. तर वर्ल्डवाईड २८३ कोटींहून अधिक कमाई केलीय.

सोमवारी किती होती स्त्री २ ची कमाई

बॅक टू बॅक सुट्ट्यांचा फायदा स्त्री २ झाला. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी देखील केली. रिलीजच्या ५ व्या दिवशी स्त्री २ ने ३७ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. रविवारी हा आकडा ५८ कोटींच्या आसपास होता.

पहिल्या दिवशी-६४.८० कोटी, दुसऱ्या दिवशी -३५.३० कोटी, तिसऱ्या-४५.७० कोटी, चौथ्या दिवशी ५८.२० कोटी, पाचव्या दिवशी - ३७ कोटी, एकूण -२४१ कोटी. स्त्री २ जवळपास २५० कोटींकडे आहे.

ओपनिंग डे ते आतापर्यंत स्त्री २ ची कमाई गती सुरुचं आहे. सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २५० कोटी पर्यंत हा चित्रपट पोहोचू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT