पुढारी ऑनलाईन डेस्क - पुष्पा -२ अभिनेता अल्लू अर्जुनला तेलंगणा हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. एक्स अकाऊंटवर याबाबत ट्विट करण्यात आले आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला जामीन मिळण्याआधी १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.
कोर्टाबाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनचे वकील सुरेश बाबू म्हणाले होते, "...कोर्टाने त्याला १४ दिवसांच्या कोठडीसाठी पाठवले आहे." वकील सुकरेश बाबू प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जुनला घेऊन पोलिस वाहन नामपल्ली कोर्टात पोहोचली होती. (हैदराबाद (तेलंगणा) पुष्पा- २ च्या प्रिमिअरवेळी एका थिएटरमध्ये महिलेचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लूला पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केलीय. तत्पूर्वी अल्लू अर्जुनची वैद्यकीय तपासणीनंतर गांधी रुग्णालयातून बाहेर नेण्यात आले. यावेळचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हिंदी चित्रपटाचे अभिनेते रझा मुराद म्हणाले, "चेंगराचेंगरी झाली. एक व्यक्ती मरण पावली आणि लोक जखमी झाले. यात अभिनेत्याचा काय दोष होता? जबाबदारी कोणाची? थिएटर अभिनेत्याच्या हातात नाही एखाद्या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे अभिनेत्याची गर्दी जमत नाही किंवा हिट चित्रपटात काम करणं हा गुन्हा नाही.. इतर काही कारण असेल तर मी बोलू शकत नाही. जर त्याला अटक झाली असेल तर त्याचीही चौकशी व्हायला हवी - त्याला का अटक करण्यात आली, याचे ठोस कारण असले पाहिजे.''
संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अटकेवर, वकील राजेश म्हणाले, "अल्लू अर्जुनला कोर्टात आणण्यात आले होते... अल्लू अर्जुनला या घटनेबाबत कोणतीही माहिती नव्हती..त्याचा कुठलाही अशा प्रकारचा हेतू नव्हता. असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला. ते म्हणाले की, एफआयआरमध्ये नमूद केलेले कथित गुन्हे त्याला लागू होत नाहीत... त्यांचे युक्तिवाद सुरू आहेत.'' एका वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवर वकिलाने माध्यमांशी बबोलतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे
दरम्यान, जयपूर (राजस्थान) येथून अभिनेता वरुण धवन अल्लू अर्जुनच्या अटकेवर म्हणाला, "अभिनेता सुरक्षा प्रोटोकॉलची संपूर्ण जबाबदारी घेऊ शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगू शकता... ही घटना दुःखद होती. मी माझ्या संवेदना व्यक्त करतो, परंतु त्याच वेळी, तुम्ही फक्त एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही. अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथून अभिनेता अल्लू अर्जुनच्या अटकेवर वायसीआरसीपीच्या नेत्या लक्ष्मी पार्वती म्हणाल्या, "अल्लू अर्जुनची अटक वेदनादायक आहे...अल्लू अर्जुनने तिथे गेल्यावर काही चूक केली नाही....
BRS नेते केटीआर यांनी यांनी ट्विट केले की, "...राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्टार अल्लू अर्जुनची अटक हे राज्यकर्त्यांच्या असुरक्षिततेचे शिखर आहे. चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांबद्दल मला पूर्णपणे सहानुभूती आहे, पण खरोखर कोण अपयशी ठरले? ...सामान्य गुन्हेगाराला विशेषत: ज्या गोष्टीसाठी तो थेट जबाबदार नाही अशा गोष्टींसाठी अयोग्य आहे..."
मला आधी शोधू द्या, नेमकं काय झालंय..मग मी तुम्हाला सांगेनतेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी
अभिनेता अल्लू अर्जुनच्या अटकेवर भाजप नेते टी राजा सिंह म्हणतात, "...तेलंगणा पोलिसांचे म्हणणे आहे की अल्लू अर्जुनने संध्या थिएटरमध्ये येण्याबद्दल त्यांना माहिती दिली नाही. यामुळे, त्याच्यासमोर मोठा जमाव जमला. थिएटर आणि त्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला... त्यामुळे संध्या थिएटरच्या मालकासह कलाकारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. संध्या थिएटरच्या मालकाने एक पत्र जारी केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी हैदराबाद सीपींना कळवले होते की, अल्लू अर्जुन, अभिनेता, दिग्दर्शक आणि अन्य सर्व लोक देखील तिथे येत आहेत हे कळवल्यानंतर देखील जर पोलिस सुरक्षा व्यवस्थेसाठी आले नाहीत. मग यामध्ये कुणाची चुकी आहे? टी राजा सिंह म्हणाले- मी रेवंत रेड्डी यांना विचारू इच्छितो की, यामध्ये अभिनेत्याची चुकी आहे?...मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, कायदा सर्वांसाठी समान आहे. कुठे आहे आपला कायदा? जेव्हापासून तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आले आहे..तेव्हापासून कायदा व सुरक्षा व्यवस्था विस्कळीत झाली आहे...मी त्यांच्या अटकेचा निषेध करतो...