पुढारी ऑनलाईन डेस्क - बिग बॉस १२ ची स्पर्धक, टीव्ही अभिनेत्री सृष्टी रोडे हिला रुग्णालयात दाखल तरण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ती युरोप ट्रीपवर होती. पण तिथे तिची अचानक तब्येत बिघडली. आणि तिला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. सृष्टीसा श्वासोच्छवास घेण्यास अडचण येत होती.
काही दिवसांपूर्वी सृष्टी युरोपमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती. पण, तिथे तिच्यासोबत एक घटना घडली. सृष्टी रोडेची तब्येत अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा व्हिसा देखील संपला होता. सृष्टी रोडेने ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे. तिने रुग्णालयातून काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सृष्टीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, तिला निमोनिया झाला होता. तिचा ऑक्सीजन लेवल देखील खाली गेले होते. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करु इच्छिते. मी युरोप ट्रिप एन्जॉय करत होते. पण, दुसऱ्या बाजूची पण एक कहाणी आहे, जे मी आतापर्यंत, शेअर केलेले नाही. हे थोडे कठीणदेखील आहे. एम्सटरडॅममध्ये असताना मी आजारी पडले होते आणि मला न्यूमोनिया झाला होता. माझं ऑक्सीजन लेवल अचानक खाली गेला. मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मला भाती वाटत होती की, मी घरी जाऊ शकेन की नाही. माझी स्थिती वाईट झाली होती. तेथून निघण्याआधी माझा व्हिसा एक्सपायर झाला. खूप संघर्षानंतर मी मुंबईत परतले आता ठिक होत आहे.