मुंबई - बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज १३ ऑगस्ट रोजी ६२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांचे पती, चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी खास क्षणांची आठवण केली. त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत विशेष आठवण सांगितली आहे. बोनी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही फोटो पोस्ट पाहता येईल. बोनी यांनी पोस्ट मध्ये काय म्हटलं?
१९९० मध्ये चेन्नईमध्ये तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत मी तिला २६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर तो तिचा २७ वा वाढदिवस होता, जेणेकरून तिला असे जाणवू दिले की, ती तरुण झाली आहे आणि ही एक प्रशंसा होती. प्रत्येक दिवसाबरोबर ती तरुण होत जात आहे पण तिला जाणवलं, की मी तिला चिडवत होतो.
खुशी कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीवर श्रीदेवी यांचा एक सिंगल फोटो पोस्ट केला आहे. शिवाय, बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये जान्हवी आणि श्रीदेवी दिसत आहेत.
बोनी कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये श्रीदेवी सूटमध्ये दिसतात. त्यांच्या समोर बोनी कपूर खिशात हात घालून उभे आहेत. काही तासातचं या फोटंना खूप साऱ्या लाईक्स आल्या आहेत. कॉमेंट बॉक्स मध्ये नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले आहे, "श्रीदेवी जी त्या अभिनेत्रींपैकी आहे, त्या रिअलमध्ये कधी म्हाताऱ्या झाल्या नाहीत." अनेकांनी रेड हार्ट इमोजी शेअर केलीय.