Sreeleela  
मनोरंजन

Sreeleela | साऊथ सुंदरी श्रीलीलाचा संजू राठोडच्या ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर ठेका, मराठमोळ्या नऊवारी साडीमध्ये खुललेले सौंदर्य पहाच!

MBBS ची पदवी नुकतीच प्राप्त करणाऱ्या श्रीलीलाचे दाक्षिणात्‍य चित्रपटसृष्टीत जलवे

Namdev Gharal

Sreeleela सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते सोशल मीडियापर्यंत एकाच नावाचा डंका पाहायला मिळतोय, ते नाव म्हणजे श्रीलीला (Sreeleela). आपल्या बहारदार नृत्याने आणि मनमोहक अभिनयाने तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. विशेषतः अलीकडेच एका मराठी गाण्यावर तिने धरलेला ठेका पाहून महाराष्ट्रातील चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत. मराठी गाण्याने जागतिक ओळख निर्माण करणाऱ्या संजू राठोडच्या गाण्यावर श्रीलीलाने खुर्चीवर बसूनच ठेका धरला आहे.

मराठमोळ्या रुपात श्रीलीला

या व्हिडीओत श्रीलीलाने लाल रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच नाकामध्ये नथही घातली आहे, हे तिचे रुप पाहून अनेकांना तिच्या या मराठमोळ्या अवताराची भुरळ पडली आहे. त्‍यात ती बॅकग्राऊंडला वाजणाऱ्या संजू राठोडच्या एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.

लोभसवाणे रुप त्‍यात मराठमोळा अवतार

श्रीलिलाचे व मराठीचे नाते तसे नवीनच नुकतेच तिने mbbs ची पदवी मिळवली आहे. तीही महारष्ट्रातील डॉ. डी. वाय पाटील मेडीकल कॉलेजमधून. तिचे पदवी घेतानाचे व्हिडीओ त्‍यावेळी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता एका प्राजेक्ट निमित्त श्रीलिला मराठी अवतारात दिसली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. तसेच चाहत्‍यांचा कंमेटचा वर्षाव् होत आहे. श्रीलीलाचा हा मराठमोळा अंदाज पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.

श्रीलीलाची ओळख

श्रीलीलाचा जन्म १४ जून २००१ रोजी अमेरिकेतील मिशिगन (डेट्रॉईट) येथे झाला. मात्र, तिचे पालनपोषण बंगळुरूमध्ये झाले. तिने २०१९ मध्ये 'किस' (Kiss) या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा 'सायमा' (SIIMA) पुरस्कार मिळाला.

तेलगू सिनेसृष्टीत श्रीलीला खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली ती 'धमाका' या चित्रपटामुळे. अभिनेता रवी तेजासोबतच्या तिच्या केमिस्ट्रीची आणि डान्सची प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर महेश बाबूंसोबतच्या 'गुंटूर कारम' चित्रपटातील 'कुर्ची मडथापेटी' या गाण्याने तर सोशल मीडियावर जागतिक स्तरावर धुमाकूळ घातला. ती पुष्पा चित्रपटात किस किस या गाण्यात दिसली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT