मनोरंजन

साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडाने घेतलेल्या ‘या’ निर्णयाने जिंकली चाहत्यांची मने

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाइन डेस्क : "गीता गोविंदम" या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा याने कमी कालावधीतच चाहत्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्व तयार केलं आहे. सोशल मीडियावर तो सतत अॅक्टीव असतो. त्याच्या फिटनेसमुळेही तो कायम चर्चेत असतो. विजय आणि त्याची आई माधवी देवराकोंडा यांनी एक, असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे विजयच्या चाहत्यांना खूप अभिमान वाटत आहे.

आपण या जगातून गेल्यानंतरही आपण जिवंत राहावं व आपले शरीर दुसऱ्याच्या उपयोगी यावं, यासाठी विजय आणि त्याच्या आईने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विजय देवरकोंडा याने आपला "हा" निर्णय चाहत्यांशी शेअर करत चाहत्यांची मने जिंकली.

अवयवदान करण्यासाठी विजयने आईसह केली नोंदणी

अवयवदानाच्या मदतीने आपण जगातून गेल्यानंतरही जिवंत राहू शकतो. असं म्हणत विजयने अवयवदान करण्यासाठी आईसह स्वत:ची नोंदणी केली. याबाबत बोलताना विजय म्हणाला की, मी गेल्यावरही मला एखाद्याच्या शरीराचा एक भाग बनून त्यांना मदत करायची आहे. म्हणून मला अवयवदान करायला आवडेल. मी व माझ्या आईने अवयवदान करण्यासाठी रजिस्टर केलं आहे. अवयवदान ही एक सुंदर गोष्ट आहे. जिच्यामुळे तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने जिवंत राहता. अवयवदानाच्या या कल्पनेला मला प्रोत्साहन द्यायचे असल्याचेही विजयने यावेळी सांगितले.­­

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT