south movie trisha krishnan aims to become chief minister herself predicted 12 years ago thalapathy vijay fans call her the next jayalalithaa
पुढारी ऑनलाईन :
थलपती विजय यांच्या मोठ्या विजयाचा जल्लोष सुरू असून, ते तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या जवळची मैत्रीण त्रिशा कृष्णनला चाहत्यांकडून ‘लेडी लक’ म्हटले जात आहे. दरम्यान, तृषाचा 12 वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती स्वतः एक दिवस राज्याची मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करताना दिसते.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते ते नेते बनलेल्या विजय यांच्या ‘तमिळगा वेट्री कळगम’ (TVK) पक्षाने 108 जागांवर विजय मिळवत इतिहास घडवला आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने सत्ताधारी एम. के. स्टालिन यांना पराभूत केले. कोलाथूर मतदारसंघातून स्टॅलिन यांचा पराभव झाला. विजय यांच्या घरात सोमवारी सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण होते. मात्र या सगळ्यात त्रिशा कृष्णनकडे सर्वांचे लक्ष होते. निकाल स्पष्ट होताच ती सर्वप्रथम विजय यांच्या घरी पोहोचली. विशेष म्हणजे 4 मे रोजी तिचा वाढदिवसही होता.
चेन्नईमध्ये 4 मे 1983 रोजी जन्मलेल्या तृषासाठी यंदाचा 43 वा वाढदिवस खास ठरला. विजय यांच्या पक्षाचा विजय याच दिवशी झाला. त्याआधी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तिने तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तेव्हाच चाहत्यांनी विजय यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली होती.
12 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जुन्या व्हिडिओमध्ये त्रिशा एका रिपोर्टरशी तमिळमध्ये बोलताना दिसते. ती सांगते की, ती एक दिवस तमिळनाडूची मुख्यमंत्री बनू इच्छिते. रिपोर्टरने ‘कसं शक्य आहे?’ असे विचारल्यावर ती आत्मविश्वासाने म्हणते, “माझ्यावर विश्वास ठेवा, थोडा वेळ द्या. दहा वर्षांत मी तुम्हाला दाखवून देईन.”
जयललिता-MGR जोडीशी तुलना
त्रिशाच्या या विधानानंतर चाहत्यांनी तिची तुलना माजी मुख्यमंत्री जयललिता आणि एमजीआर यांच्या जोडीशी केली आहे. दोघींमध्ये काही साम्य असल्याचेही सांगितले जात आहे. दोघीही ब्राह्मण कुटुंबातील, एकाच शाळेत शिक्षण, अविवाहित राहणे आणि सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळख. त्यामुळे काही जण विजय-त्रिशा जोडी भविष्यात राजकारणातही प्रभावी ठरेल असे म्हणत आहेत.
त्रिशा सध्या राजकारणात नाही
सध्या त्रिशा कृष्णन राजकारणात सक्रिय नाही. ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 1999 मध्ये ‘मिस चेन्नई’ किताब जिंकल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 26 वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ‘घिल्ली’, ‘थिरुपाची’, ‘आथी’ आणि ‘कुरुवी’ या विजयसोबतच्या तिच्या चित्रपटांनी मोठे यश मिळवले आहे.
विजय-त्रिशा जोडी आणि चर्चेतले नाते
विजय आणि त्रिशाची जोडी तमिळ चित्रपटसृष्टीत सुपरहिट मानली जाते. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही दीर्घकाळ सुरू होत्या. 2008 नंतर काही काळ त्यांनी एकत्र काम केले नाही, मात्र 2023 मध्ये ‘लियो’ चित्रपटातून ते पुन्हा एकत्र आले. या पुनरागमनामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले.
वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी
2025 मध्ये विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यांनी पतीचे एका अभिनेत्रीशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यामुळेही त्रिशा आणि विजय यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या.
त्रिशाचे आगामी चित्रपट
2025 मध्ये त्रिशाच्या ‘आयडेंटिटी’, ‘गुड बॅड अग्ली’, ‘विदामुयार्ची’ आणि ‘ठग लाइफ’ हे चित्रपटांचा प्रदर्शित झाले. आता ती सूर्यासोबत ‘Karuppu’ या चित्रपटात दिसणार असून तो 14 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘विश्वंभरा’ आणि ‘राम’ हे चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहेत.