pushpa impossible  
मनोरंजन

पुष्‍पा इम्‍पॉसिबल : परीक्षेच्‍या निकालाची वाट पाहत असलेली पुष्‍पा चिंताग्रस्‍त

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही आठवडे सोनी सबवरील मालिका 'पुष्‍पा इम्‍पॉसिबल'ने प्रेक्षकांना ड्रामा व मनोरंजन दिले आहे. पुष्‍पाचा शिक्षण घेण्‍याच्‍या दुसऱ्या संधीसाठी साहसी लढा असो, तिच्‍या प्रियजनांनी तिला दिलेला पाठिंबा असो किंवा यशस्‍वी होण्‍याची संधी डावलून गरजू मुलांना मदत करण्‍याची तिचे नि:स्‍वार्थ कार्य असो मालिकेने प्रेक्षकांच्‍या मनात खूप उत्‍सुकता निर्माण केली आहे.

परीक्षेच्‍या वेळी शाळेतील विद्यार्थी घाबरून जातात. हे पाहून पुष्‍पा चिंतीत होते. ती स्‍वत:ची परीक्षा डावलून विद्यार्थ्‍यांना मदत करते आणि त्यांच्यासाठी उपाय शोधून काढते. पण यामुळे तिच्‍या समस्‍यांमध्‍ये अधिक वाढ होते. कारण तिची परीक्षा देण्‍याच्‍या संधी कमी होऊ लागतात. तिच्‍या दयाळूपणाच्‍या कृत्‍याला फळ मिळते. कारण कृतज्ञ पालक बोर्डकडे पुष्‍पाला परीक्षेसाठी दुसरी संधी देण्‍याची विनंती करतात. प्रकरण अधिक चिघळू नये म्‍हणून बोर्ड तिला परीक्षा देण्‍यास परवानगी देते. पण मोठी समस्‍या अजून यायची आहे, जेथे परीक्षा देणे हे अर्धे शिखर गाठल्‍यासारखे आहे, परीक्षेचा निकाल देखील महत्त्वाचा असतो आणि पुष्‍पासाठी हे अधिक महत्त्वाचे आहे.

पुष्‍पा परीक्षेमध्‍ये उत्तीर्ण की अनुत्तीर्ण होईल?

पुष्‍पाची भूमिका साकारणारी करूणा पांडे म्‍हणाली, "आपणा सर्वांना माहित आहे की परीक्षा देणे अत्‍यंत खडतर असते. पण परीक्षेचा निकाल जाणून घेण्‍याच्‍या उत्‍सुकतेमधून अधिक तणाव येतो. तुमच्‍यासोबत तुमचे आई-वडील देखील तणावग्रस्‍त असतात हे विसरून चालणार नाही. पुष्‍पाच्‍या प्रियजनांना देखील अशाच प्रकारचा तणाव येणार आहे. तसेच पुष्‍पासाठी ही सामान्‍य परीक्षा नाही. कदाचित ही तिच्‍या जीवनातील शेवटची परीक्षा असेल. म्‍हणून निकाल जाणून घेण्‍याच्‍या उत्‍सुकतेने अधिक तणाव आहे.

या सीक्‍वेन्‍ससाठी शूटिंग करताना मला माझे शालेय दिवस आठवले. पुष्‍पा आणि तिच्‍या प्रियजनांच्‍या मेहनतीला फळ मिळते की नाही हे जाणून घेण्‍यासाठी तुम्‍हाला मालिका पाहावी लागेल.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT