मनोरंजन

Fateh Movie : सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिसच्या ‘फतेह’ चित्रपटाबद्दल नवी अपडेट आली समोर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनू सूदचे चाहते त्याच्या आगामी 'फतेह' चित्रपटाच्या दुनियेचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहेत. (Fateh Movie) अभिनेत्यानेही उत्साह टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. टीझरसह 'फतेह' ची झलक दाखवल्यानंतर सोनू सूदने त्याच्या सोशल मीडियावर बीटीएस शेअर केले आहेl. फोटो शेअर करत सूदने लिहिले की, 'फतेह'साठी सज्ज व्हा." (Fateh Movie)

त्याने पोस्ट टाकताच चाहत्यांनी कॉमेंट्स करून नव्या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता व्यक्त केली. एका चाहत्याने सांगितले की, हा चित्रपट "ब्लॉकबस्टर इन द मेकिंग" आहे. सोनू सूदने 'फतेह'साठी अनेक भूमिका साकारल्या आहेत. या प्रोजेक्टद्वारे तो केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शनातही पदार्पण करत आहे. यापूर्वी सोनू ने सांगितलं होते की, हा चित्रपट हॉलीवूड कलाकारांच्या बरोबरीने असेल.


सोनू सूदने यापूर्वी माहिती दिली होती की, चित्रपट पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागली. हा चित्रपट भारत, यूएसए, रशिया आणि पोलंडच्या अनेक ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे. सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सूदच्या शक्ती सागर प्रॉडक्शनने झी स्टुडिओजच्या सहकार्याने केली आहे. या वर्षी रिलीज होणार आहे.

SCROLL FOR NEXT