पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड गायक सोनू निगम (Sonu Nigam) वर लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दगडफेक झाल्याची घटना समोर आलीय. इतकचं नाही तर उपस्थितांनी स्टेजवर बाटल्यादेखील फेकल्याचे समजते. दिल्लीतील एका विद्यापीठात परफॉर्म करायला सोनू निगम गेला होता. तिथे लाखोंच्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते. तेव्हा अचानक काहीतरी गोंधळ झाला आणि स्टेजवर दगडफेक झाली.
सोनू निगम दिल्लीतील एका नामवंत विद्यापीठात रविवारी परफॉर्मन्स देण्यासाठी गेला होता. पण, तिथे काही कारणाने राडा झाला आणि गायक सोनू निगमला आपला कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. लाखो विद्यार्थ्यांच्या गर्दीतील एका ग्रुपने स्टेजवर दगड आणि बाटल्या फेकणे सुरू केले, त्यामुळे त्याची टीम घाबरली.
रिपोर्टनुसार, सोनू निगमने उपस्थितांना विनंती केली की, 'असे काही करू नका. तुमच्यासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी मी तुमच्यासाठी इथे आलोय.' सोनू म्हमाला की, त्याच्या टीममधील काही सदस्य जखमी झाले आहेत.