सूरज बडजात्या दिग्दर्शित २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रेम रत धन पायो' या चित्रपटात सलमान खान आणि सोनम कपूर हे प्रमुख भूमिकेत झकळले होते; पण सुरुवातीला सलमान हा सोनमसोबत काम करण्यास तयार नव्हता, असा खुलासा एका मुलाखतीत सूरज बडजात्यांनी केला आहे. ते म्हणाले की, मी कथानक लिहिले आणि त्यानुसार कोणत्या नायिका ते पात्र चांगल्या पद्धतीने साकारू शकतात, याबाबत सलमानशी बोललो. आमच्याकडे खूप नावे होती; पण मला नवीन चेहरा हवा होता. 'रांझना' या चित्रपटातील सोनमचे काम पाहिल्यानंतर असे वाटले की,
'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी ती उत्तम आहे. मी सोनमला या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी घेण्यासाठी निर्णय घेतला आणि सलमानला तिचे फोटो दाखवले. त्याने त्या फोटोंकडे पाहिले आणि मला म्हटले, सूरज, मला विचार करू दे, महिना गेला तरीही तो विचारच करीत होता. सलमानला सोनमचे वय आणि उंचीबद्दल काळजी वाटली होती. ती खूप उंच आहे ना? आणि ती माझ्यापेक्षा वयानेही खूपच लहान आहे. तिला मी मोठे होताना पाहिले आहे. चित्रपटात तिच्याबरोबर रोमान्सचे सीन कसे करू शकतो, असे सलमान मला म्हणाला.