कलाविश्वातील अनेक कलाकार चर्चेत असतात. अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या फॅशनमुळे ओळखली जाते. सोनम ही ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची लेक आहे. २००७ मध्ये 'सावरियों' या चित्रपटातून तिने बॉलीवूड पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत होता. आता तिच्या दिवाळीनिमित्ताने नव्या लूकची चर्चा रंगली आहे. सोनमने दिवाळीनिमित्त हटके ड्रेसमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे आऊटफिट कर्नाटकमधील लाल आणि मुलतानी मातीपासून तयार केले असल्याचे कॅप्शन सोनमने आपल्या फोटोंना दिले आहे.
सोनम म्हणाली की, माझा लेहेंगा आणि ओढणी ही खादीची आहे. हा पोशाख भूमीशी असलेले आपले नाते सांगतो. जिथून आपण आलो आहोत, ती आंतरिक शक्ती आणि अभिमान जागृत करणारा हा पोशाख आहे. याचे महत्त्व खूप आहे. या दिवाळीला परंपरा आणि मूळांशी अशा प्रकारे स्वतःला जोडता आले, त्याबाबत मी कृतज्ञ आहे. आता सोशल मीडियावर सोनमच्या या पोशाखाची खूपच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी तिच्या हटके लूक आणि पोशाखाचे कौतुक केले आहे. ती या ड्रेसमध्ये खूपच त सुंदर दिसत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. आता सोनमचे कौतुक केले जात आहे.