देशभरात रविवारी करवा चौथचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. करवा चौथच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना आणि व्रत करतात. इतकेच नाही, तर महिला पूजेसाठी संपूर्ण दे साजशृंगारही करत असतात. बी-टाऊनमधीलही अनेक अभिनेत्री पतीसाठी व्रत ठेवत असतात. यंदाच्या वर्षी अनेक अभिनेत्रींचा पहिला करवा चौथ आहे. यातीलच एक म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही करवा चौथ साजरा केला. तिने पतीसाठी व्रत केले. यासाठी सोनाक्षी नव्या नवरीप्रमाणे नटली होती. त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केले आहेत.
लाल साडी, सिंदूर आणि मंगळसूत्र, लाल टिकली लूकमध्ये अभिनेत्री नव्या नवरीसारखी नटली आहे. चाहत्यांनाही तिचे फोटो खूपच आवडले आहेत. तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना! प्रत्येक दिवसांसाठी करवा चौथच्या शुभेच्छा! अशी कॅप्शन सोनाक्षीने आपल्या फोटोंना दिली आहे. सोनाक्षीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. सोनाक्षीने २३ जून २०२४ मध्ये बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केले. आता अभिनेत्री लग्नानंतर पहिल्यांदा करवा चौथ साजरी करत आहे.