पुढारी ऑनलाईन डेस्क -अतिथि तुम कब जाओगे, सन ऑफ सरदार, गेस्ट इन लंदन यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अश्विनी धर यांच्या मुलाचे निधन झाले. त्यांचा १८ वर्षांचा मुलगा जलज धीर आपल्या तीन मित्रांसमवेत ड्रायव्हिंगसाठी घरातून निघाला होता. २३ नोव्हेंबर शनिवारी सकाळी-सकाळी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे विले पार्ले नजीक कारचा अपघात झाला.
रिपोर्ट्सनुसार, या अपघातात जलजच्या सोबत आणखी एका मित्राला जीव गमवावा लागला. पोलिसांनी ड्रायव्हिंग करत असलेल्या मित्राला अटक केली आहे.
रिपोर्टनुसार, २३ नोव्हेंबर रोजी जलज आपल्या तीन साहिल मेंधा, सार्थ कौशिक, जेडन जिमी सोबत कार ड्रायव्हिंगसाठी निघाले होते. जिथे साहिल आणि जेडन पुढील सीटवर बसले होते तर जलज आणि आणखी एक मित्र सार्थ मागील सीटवर बसले होते. असाही दावा केला जात आहे की, १८ वर्षाय साहिलने मद्यपान केले होते. नशेत धुर्त असल्याने मुंबईतील विले पार्लेमध्ये उपस्थित एका हॉटेलवळ असणाऱ्या डिव्हायडरवर ही कार चढली. साहिल-जेडन गंभीर जखमी झाले नाही. जलज आणि सार्थ मात्र गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. आधी जोगेश्वरी रुग्णालयात नंतर अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
रिपोर्टनुसार, जेडन जिमीच्या जबाब आधारे साहिलला मुंबई पोलिसांनी अटक केली. जिमीने आपल्या जबाबात सांगितले की, साहिल जेव्हा आपल्या मित्राच्या घरातून परत येत होता, तेव्हा त्याने मद्यपान केले होते. २२ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता तो जलजच्या घरी आला. त्याच्या नंतर त्या सर्वांनी २३ नोवेहंबरला मद्यरात्री साढे तीन वाजता ड्रायव्हिंगला जाण्याचा निर्णय घेतला.
जिमीच्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजण्याच्या जवळपास ते बांद्रा येथे पोहोचले. साहिल ड्रायव्हिंग सीटवर होता, घरी परतताना त्याने १२० ते १५० km च्या गतीने गाडी चालवली. त्यामुळे गाडी अनियंत्रित झाली. असेही म्हटले जात आहे की, जलजच्या वडिलांना न सांगता हे सर्वजण ड्रायव्हिंगसाठी निघाले होते.