सोहम बंडेकर आणि पूजा बिरारी यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पारंपरिक विधी, सुंदर पेहराव आणि गोड क्षणांच्या भरलेल्या या लग्नसोहळ्याबद्दल चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.
Soham Bandekar-Pooja Birari Wedding photo goes viral
अभिनेते आदेश बांदेकर-सुचित्रा यांच्या मुलगा सोहमचा लग्न सोहळा पार पडला.
टीव्ही अभिनेत्री पूजा बिरारी सोबत तो विवाहबद्ध झाला असून त्याचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
या दोघांनी लोणावळ्यात लग्नगाठ बांधली. पूजाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसून त्यावर पिवळ्या रंगाची शाल घेतली होती. जरीवर्क ब्लाऊज तिने घातले होते.
तर, सोहमने देखील बेबी पिंक रंगाचा डिझायनर कुर्ता घातला होता.
याावेळी सिनेसृष्टीतल्या कलाकारांनी लग्न सोहळ्याला हजेरी लावली
लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये लग्नाची सुंदर तयारी करण्यात आली होती
सोहळ्यात फुलांची अनोखी सजावट पाहायला मिळाली
या सोहळ्यात पूजा आणि सोहमने ग्रँड एन्ट्री घेतली