पुढारी ऑनलाईन डेस्क - नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने ४ डिसेंबर रोजी पारंपरिक तेलुगु रीतीरिवाजाप्रमाणे लग्न केले. आज दोघांना पत्नी-पती म्हणून ६ डिसेंबर रोजी पहिल्यांदा पब्लिकमध्ये स्पॉट करण्यात आलं. या न्यूली वेड कपल सोबत अभिनेता आणि नागा चैतन्यचे वडील नागार्जुन देखील दिसले.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसले. हे कपल आशीर्वाद घेण्यासाठी आंध्र प्रदेशच्या श्रीशैलममध्ये प्रसिद्ध श्री भ्रमरम्बा सहिता मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानम मंदिरात पोहोचले. त्यांच्या मंदिर दर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नागार्जुन देखील सोबत होते.
मंदिराच्या बाहेर फोटोग्राफर्सनी नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या प्रतिमा कॅमेराबद्ध केल्या. तेलुगु चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य आणि तसेच चित्रपट आणि वेब सीरीज फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाने हैदराबादमध्ये अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये एका खासगी समारंभात लग्न केले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. दरम्यान, कपलने नागार्जुन यांच्यासोबत श्रीशैलम श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात आशीर्वाद घेतला. या दर्शनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे कपल पारंपरिक पोषाखात दिसले. शोभिता पिवळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती तर चैतन्यने शर्ट आणि पिवळ्या रंगाच्या शॉल सोबत व्हाईट ड्रेस परिधान केला होता.