अभिनेत्री स्नेहलता वसईकरने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढऱ्या साडीत फोटोशूट केले आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सोयराबाईसाहेबांच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर
या व्यक्तिरेखेत तिने खास रंग भरत ती लोकप्रिय केली.
आता स्नेहलताने नवरात्रीनिमित्त खास फोटो शूट केले आहे. ऑफ व्हाईट सॅटीन साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज असा लुक आहे.
यासोबत तिने नाकात काहीशी मोठी चंद्रनथ घातली आहे. मोकळ्या केसात लेअर्ड ब्रोच लावला आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ती कधी शांत, कधी उग्र, तिच्यातच आहे देवीचं रूप, आपल्याच अंतःकरणातून ती स्वत:ला जागवत जाते, क्षणात उभी राहते शक्तीस्वरूप'
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनंतर ती अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावर आधारित मालिकेत गौतमीबाईंच्या व्यतिरेखेत दिसली होती
याशिवाय ती नुकतेच रिलीज झालेल्या 'आरपार' या रोमॅंटिक सिनेमातही दिसली होती