Death Anniversary Smita Patil : अभिनयातील स्मिता नावाचं वादळ…  Death Anniversary Smita Patil
मनोरंजन

 Death Anniversary Smita Patil : अभिनयातील स्मिता नावाचं वादळ…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोरंजन विश्वातील सोनेरी पर्व असलेली एक अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. (Smita Patil) दूरदर्शन वृत्तनिवेदिका ते एक यशस्वी अभिनेत्री असा प्नवास असणाऱ्या या अभिनेत्रीने एक काळ आपल्या अभिनयाने गाजवला होता. आजही त्यांचा अभिनय लोकांच्या मनाला भूरळ घालतो. अल्पावधीत त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजच्या दिवशी स्मिता आपल्यातून निघून गेल्या. (Death Anniversary Smita Patil) जाणून घेवूया स्मिता पाटील यांच्याबद्दल.

अभिनयातील एक वादळ

स्मिता पाटील (Smita Patil) म्हणजे अभिनयातील एक वादळ होतं. त्यांनी अल्पावधीत आपल्या निखळ सौंदर्याने आणि अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात आपलं एक अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यांचा जन्म पुण्याचा. माजी मंत्री असलेल्या शिवाजीराव पाटील हे त्यांचे वडील. बाबा राजकीय नेतृत्व तर आई विद्या पाटील या सामाजिक कार्यकर्त्या. लहानपणापासून अभिनयाची गोडी असणाऱ्या स्मिता यांनी चरणदास चोर या चित्रपटातून अभिनयाला सूरूवात केली. अवघ्या १० वर्षाच्या आपल्या अभिनय कारकिर्दीत ८० हून अधिक एकापेक्षा एक चित्रपट केलं. वयाच्या अवघ्या ३१ वर्षी त्यांच निधन झालं.

वडील राजकीय नेतृत्व

स्मिता पाटील यांचे वडिल म्हणजे माजी मंत्री, माजी खासदार व शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले शिवाजीराव गिरीधर पाटील (Shivajirao Girdhar Patil) होतं. ते आपल्या राजकीय कारकिर्दीत तब्बल १२ वर्षे महाराष्ट्राचे सहकार मंत्रिपदावर होते. तरुण वयात असताना स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी प्रज्ञा समाजवादी पक्षामधून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास होता. १९६० ते १९६७ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य होते. तर १९६७ ते १९८० या काळात ते १९६७, १९७२ आणि १९७८ मध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुका जिंकून आमदार पद भुषविले होते. शिवाजीराव पाटील यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पदे भुषविली. २०१३ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. वयाच्या ९२ वर्षी त्यांच निधन झाले.

स्मिता नावाचं पर्व

दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका ते एक अभिनेत्री असा प्रवास असणीरी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात झाला. माजी मंत्री शिवाजीराव पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या पाटील यांच्या त्या कन्या. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली होती. १९७० मध्ये दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी चरणदास चोर या चित्रपटातून आपल्या अभिनयाला सूरूवात केली. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी तब्बल ८० चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 'भूमिका' या चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. १९८५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारांने गौरवण्यात आले. त्यांच्या निधनानंतर १२ हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

विवाहीत राजच्या प्रेमात पडल्या होत्या

स्मिता विवाहित असलेल्या अभिनेता राज बब्बर (Raj Babbar) यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दोन मूले असलेल्या राज बब्बर यांनी स्मिता यांच्याशी लग्न केले. स्मिता आणि राज यांच्या लग्नानंतर कलाविश्वात खळबळ उडाली होती. त्या दोघांच्या प्रेमाचं प्रतिक असलेला त्यांचा मुलगा प्रतिक बब्बर (Prateik Babbar) हा बॉलिवूड अभिनेता आहे. वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता यांचे निधन झाले. आपल्या निधनानंतर आपल्याला एखाद्या सवाष्ण स्त्री सारखा सजवावं अशी त्यांची इच्छा होती. निधनानंतर त्यांना सवाष्ण स्त्री सारखा सजवण्यात आलं होतं. मेकअपमन दीपक सावंत यांनी त्यांना सजवलं होतं.

जैत रे जैत, उंबरठा, भूमिका, आक्रोश, अर्थ, मिर्च मसाला, मंडी, नादान, शक्ती, बाजार, शराबी, तरंग, रावण, अमृत, अनोखा रिश्ता असे एका पेक्षा एक चित्रपट स्मिता यांनी केले. उण्यापुऱ्या १० वर्षाच्या आपल्या अभिनय कारकिर्दीत ८० हून अधिक एकापेक्षा एका चित्रपटात अभिनय केला होता. जैत रे जैत मधील चित्रपटातील स्मिता यांच्या गाण्याने आणि अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर छाप पाडली होती. आजही ती गाणी चाहत्यांच्या मनावर भूरळ घालून आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात बिनधास्त भूमिका केल्या. त्या खासगी आयुष्यातही तितक्याच बिनधास्त होत्या. नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, सावळं, निखळ सौंदर्य असं समीकरण असलेल्या स्मिता या नेहमीच चाहत्यांच्या आठवणीत राहतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT