पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता अक्षय कुमारचा रिलीज झालेला स्काय फोर्स थिएटर नंतर आता ओटीटी वर रिलीज झाला. पण, स्काय फोर्स ओटीटीवर पाहण्यासाठी थोडे पैसे देखील मोजावे लागणार आहेत. बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारचा रिलीज झालेला देशभक्तीपर चित्रपट ‘स्काय फोर्स’ आता थिएटर नंतर ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट २४ जानेवारी, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. या चित्रपटाची कहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडली.
अक्षय कुमारच्या या चित्रपटाच्या माध्यमातून वीर पहाडियाने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. सारा अली खानने चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारलीय. सोबतच चित्रपटात निमृत कौरची देखील मुख्य भूमिका आहे. स्काय फोर्स ॲमेजॉन प्राईम व्हिडिओवर पाहता येईल. पण रेग्युलर सब्सक्रिप्शन असणाऱ्यांना हा चित्रपट पाहता येणार आहे.
खिलाडी कुमारच्या स्काय फोर्सने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये इंडिया आणि वर्ल्डवाईड चांगली कमाई केली होती. यावर्षी २०२५ मध्ये छावा नंतर आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट आहे. स्काय फोर्सने इंडियामध्ये नेट कलेक्शन ११३.५२ कोटींचे कलेक्शन केले होते. वर्ल्डवाईड अक्षय कुमारच्या स्काय फोर्सने एकूण १४९.९ कोटींच्या जवळपास कमाई केली.