Sitaare Zameen Par Screening Video:
मुंबई - आमिर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सितारे जमीन'पर आज २० जून रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मुंबईमध्ये चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले. यावेळी बॉलिवूडचे तमाम सितारे सहभागी झाले. सितारे जमीन पर एक खास चित्रपट आहे. चित्रपटामध्ये जेनेलिया डिसुझाने अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे. स्क्रिनिंगवर ती खूप उत्सुक दिसली. यावेळी तिचा पती, अभिनेता रितेश देशमुखनेही एन्ट्री घेतली. रितेश आणि जेनेलिया दोघेही क्यूट दिसले.
आमिर खान, जेनेलिया आणि रितेश तिघांनीही व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी त्यांचे क्यूट मोमेंट्स कॅमेराबद्ध झाले. तिन्हीही कलाकारांनी यावेळी व्हाईट आऊटफिट परिधान केले होते. रितेश यावेळी स्टायलिश ड्रेसमध्ये दिसला तर जेनेलियाने साडी नेसली होती. सिंपल मेकअपमध्येही ती खूप सुंदर दिसली. आमिर खानच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत होता.
यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलिया पापराझींसाठी पोज देत होते. तेव्हा आमिर खान येतो. पॅप्स त्यांना जेनेलिया सोबत फोटो पोज देण्यासाठी सांगतात. पापराझी जेनेलिया-रितेशचे फोटो क्लिक करत होते, त्यावेळी रितेश म्हणतो-दोघे आरामशीर फोटो काढा आणि तो तिथून निघून जातो. यावेळी पापराझींनी कॅमेरा रितेशकडे फिरवला, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले. दुसरीकडे, जेनेलिया आणिर हसू लागले आणि रितेशला पुन्हा आपल्याकडे बोलावलं. पापराझींनी तिघांचे क्यूट व्हिडिओ कॅमेराबद्ध केले.
सितारे जमींन पर ऑटिज्म स्पेक्ट्रम वा डाऊन सिंड्रोम असणाऱ्या विशेष मुलांवर आधारित असणारा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. यामध्ये जेनेलिया आणि आमिर खान मुख्य भूमिकेत आहेत.
video-viral bhayani Instagram वरून साभार