सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झाला instagram
मनोरंजन

सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज, अजय देवगनचा ॲक्शन तडका

Singham AgainTrailer - सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज, अजय देवगनचा ॲक्शन तडका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - रोहित शेट्‌टीचा मल्टीस्टारर चित्रपट ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जवळपास ५ मिनिटांचा हा ट्रेलर वाटते की, चित्रपटाची कहाणी ‘रामायण’शी प्रेरित आहे. चित्रपटामध्ये अजय देवगन राम, करीना कपूर सीता, टायगर श्रॉफ लक्ष्मण, रणवीर सिंह हनुमान, अक्षय कुमार जटायु आणि अर्जुन कपूर रावणशी प्रेरित भूमिकांमध्ये दिसणार आहेत. कहाणी बाजीराव सिंघम (अजय देवगन)पासून सुरू होते. त्याची पत्नी अवनी (करीना कपूर) ला श्रीलंकेचा खतरनाक गुंड डेंजर लंका (अर्जुन कपूर) उचलून नेतो.

त्यानंतर पत्नीला वाचवण्यासाठी निघालेल्या सिंघमची मदत शक्ती शेट्‌टी (दीपिका पादुकोण), एसीपी सत्या (टायगर श्रॉफ), सूर्यवंशी (अक्षय कुमार) आणि सिम्बा (रणवीर सिंह) करतात. 'सिंघम ३' चा ट्रेलर ५ मिनिटांचा आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सर्वात मोठा ट्रेलर असल्याचे म्हटलं जात आहे.

जॅकी श्रॉफची निगेटिव्ह भूमिका 'सूर्यवंशी' पासून पुढे जाते. ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की, आता बाजीराव सिंघम परिवाराचा मुलगा टीनेजर झाला आहे. कहाणीमध्ये सिंघमची पत्नी (करीना कपूर) चे अपहरण केले आहे आणि सिंघमने आपल्या मुलासमोर दावा केला आहे की, जिच्यावर तो प्रेम करतो आणि ज्याचा त्याला द्वेष आहे, त्यांच्यासाठी तो कुठेही जाऊ शकतो. ट्रेलर पाहून वाटतं की, यावेळी रोहित शेट्टीची पोलिस फोर्स हे मिशन पूर्ण करण्यासाठी श्रीलंका जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT