सिंघम अगेनचे जय बजरंगबली गाणे उद्या येणार, पाहा झलक  instagram
मनोरंजन

सिंघम अगेनचे जय बजरंगबली गाणे उद्या येणार, पाहा झलक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - अजय देवगनचा ‘सिंघम अगेन’ १ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. तर कार्तिक आर्यनचा भूलभुलैय्या ३ देखील यावेळी रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटांचे क्लॅश होताना दिसणार आहे. दिवाळीच्या औचित्याने हे दोन्ही चित्रपट सिनेमागृहात रिलीज होत आहेत. दरम्यान, सिंघम अगेन या चित्रपटातील जय बजरंगबली हे गाणे उद्या रिलीज होणार आहे. आज त्याची झलक दाखवण्यात आली आहे.

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या गाण्यातील सर्व भूमिका स्पष्ट दिसत आहे. रोहित शेट्टीने लिहिलंय, सिंघम अगेनचे संपूर्ण गाणे उद्या रिलीज होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, अक्षय कुणार दिसणार आहेत. चित्रपटात दीपिका पदुकोण आणि करीना कपूर यांची महत्त्वाची भूमिका असेल.

कार्तिक आर्यनचा 'भुलभूलैय्या-३'

कार्तिक आर्यनच्या 'भूलभुलैया ३' मध्ये कार्तिक सोबत आधी विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या भूमिका आहेत. रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी त्याला फ्रेंचायजीच्या चौथ्या चित्रपटासाठी देखील साईन केलं आहे.

'भूलभुलैया ४' मध्ये असेल कर्तिक आर्यन?

रिपोर्ट्सनुसार, 'भूल भुलैया ३' रिलीज होण्याच्या आधी प्रोडक्शन हाऊस टी सीरीजने कार्तिक आर्यनला 'भूलभुलैया ४' साठीही साईन केलं आहे. सूत्रांनुसार, 'टी-सीरीजचे प्रोड्यूसर्सना हा विश्वास आहे की, तिसरा चित्रपट पार्ट २ च्या कलेक्शनलादेखील मागे टाकेल. हा चित्रपट पर्ट २ पेक्षाही अधिक विनोदी असेल. आता चौथ्या पार्टसाठीदेखीस एका आयडियावर काम सुरू झालं आहे. पार्ट ३ च्या रिलीज नंतर पार्ट ४ वर देखील तत्काळ काम सुरू होईल.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT