पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सिंघम अगेन आणि भूलभुलैया ३' ने मिळून तीन दिवसात २०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. 'सिंघम अगेन -भूल भुलैया ३' दिवाळीच्या निमित्ताने रिलीज झाले. बॉक्स ऑफिसवर आपल्या कमाईने धमाका केला आहे. 'सिंघम अगेन - भूलभुलैया-३' दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
'सिंघम अगेन' २०२४ दुसरी सर्वात मोठी ओपनिंग ठरणारे हिंदी चित्रपट ठरले आहेत. 'भूलभुलैया-३' हा २०२४ मधील तिसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनून सामने आला आहे. 'सिंघम अगेन' अजय देवगन आणि 'भूलभुलैया ३' कार्तिक आर्यनच्या करिअरची आतापर्यंत सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. 'सिंघम अगेन आणि भूलभुलैया ३' ने आपल्या रिलीजच्या तीन दिवस म्हणजेच पहिला आठवडा पूर्ण केला आहे. जाणून घेऊया 'सिंघम अगेन - भूलभुलैया-३'ने पहिल्या वीकेंडची आणि तिसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे...
रोहित शेट्टी दिग्दर्शित कॉप ॲक्शन मल्टीस्टारर चित्रपट सिंघम अगेनमध्ये अजय देवगन, करीना कपूर खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफला ॲक्शन करताना पाहिलं जाऊ शकतं. सिंघम अगेनने ४३.७० कोटी रुपये कमवून बॉक्स ऑफिसवर खाते उघडलं होतं. तर दुसऱ्या दिवशी ४२.५ कोटी रुपये आणि रविवारी ३५ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.
सिंघम अगेनने पहिल्या वीकेंडमध्ये १०० कोटी रुपयांचा आकडा पार करून १२१ कोटी कमावले. रिपोर्टनुसार, सिंघम अगेनने दोन दिवसात ८८.२० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर भूलभुलैया ३ ने आतापर्यंत ११०.२ कोटींची कमाई केली आहे.