Singer Zubeen Garg Last funeral Instagram
मनोरंजन

Singer Zubeen Garg Last Rites | गायक जुबीन गर्ग पंचतत्वात विलीन

Singer Zubeen Garg Last Rites | गायक जुबीन गर्ग पंचतत्वात विलीन

स्वालिया न. शिकलगार

  • गायक पापोन यांनी अखेरची श्रद्धांजली वाहिली

  • जुबीन यांची पत्नी गरिमा सैकिया आणि कुटुंबीयांनीही श्रद्धांजली वाहिली

  • ज़ुबीन यांच्या अंत्यसंस्कारावेळी जुबिली बरुआ अस्वस्थ दिसले. दोन्ही गायकांनी अनेक गाणी एकत्र गायली होती

  • गायकाच्या के प्रशंसकांनी अंत्यसंस्कारस्थ‍ळी त्यांचे सर्वोत्तम गाणे 'मायाबिनी' गायले

    गर्ग यांनी याआधी अनेकदा म्हटले होते की, निधन झाल्यानंतर हे गाणे गायले किंवा वाजवले गेले पाहिजे

  • गायक ज़ुबीन गर्ग यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्याची तयारी सुरु

  • जुबीन गर्ग यांच्या पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांना कमरकुची एनसी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी अश्रू अनावर

  • आसाम पोलिसांनी बंदुकीची सलामी दिल्यानंतर जुबीन यांच्या पार्थिवाला त्यांची बहिण पाल्मी बोरठाकुर आणि भाच्याने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले

Singer Zubeen Garg Last funeral

नवी दिल्ली - गायक जुबीन गर्ग पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर जुबीन यांच्या पार्थिवाला त्यांची बहिण पाल्मी बोरठाकुर आणि भाच्याने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. आज कामरकुची येथे अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव आणण्यात आले होते. दरम्यान, आसाम पोलिसांनी बंदुकीची सलामी दिली. यावेळी त्यांची पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांना कमरकुची एनसी गावातील स्मशानभूमीत अश्रू अनावर झाले.

गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात सांगितले होते.

दुसऱ्या शवविच्छेदनानंतर गुवाहाटीच्या क्रीडा संकुलातून आसामी गायक गर्ग यांची अंत्ययात्रा सुरू झाली. गामोसा (गमचा हा पारंपरिक खरखरीत सुती कापडाचा आयताकृती शालसारखे असते) घालून त्यांच्या मूळ गावी कामरकुची येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यावेळी हजारो लोक उपस्थित होते.

काय म्हणाले होते आसामचे मुख्यमंत्री?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते की, गायक जुबीन गर्ग यांचे पाथित्रव स्मशानभूमीकडे मंगळवारी सकाळी ७:३० वाजण्याऐवजी सकाळी ९:३० वाजता सुरू होईल, त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दुसरी शवविच्छेदन तपासणी केली जाईल. पहिले शवविच्छेदन सिंगापूरमध्ये करण्यात आले, जिथे १९ सप्टेंबर रोजी गर्ग यांचे बुडून निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार मंगळवारी गुवाहाटीच्या बाहेर पूर्ण राजकीय सन्मानाने केले जाईल.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली होती की, सकाळी ७ वाजता गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये एम्स गुवाहाटी येथील पथकाच्या देखरेखीखाली नवीन शवविच्छेदन केले जाईल. त्यांच्या आकस्मिक मृत्यूच्या चौकशीत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गामोसा घालून काचेच्या शवपेटीत पार्थिव

लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांची अंत्ययात्रा मंगळवारी गुवाहाटीतील अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा संकुलातून सुरू झाला. जिथे त्यांचे पार्थिव चाहते, हितचिंतक आणि सेलिब्रिटींना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठेवण्यात आले होते. गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दुसऱ्यांदा शवविच्छेदन केल्यानंतर, त्यांचे पार्थिव पुन्हा संकुलात आणण्यात आले आणि नंतर फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. काचेच्या शवपेटीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, गायक गर्ग यांचे परिवार, मित्रांसहित अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी ज़ुबीन गर्ग यांना श्रद्धांजली वाहिली.

video -Himanshu katoch x account वरुन साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT