मुंबई : पुढारी ऑनलाईन
गोड गळ्याची गायिका श्रेया घोषालने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने आपल्या प्रेग्नेन्सीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिचा बेबी बॅम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. ती आपल्या बेबी बम्पकडे पाहत असून हा फोटो तिने आपल्या इन्स्टावर शेअर केला आहे. तिने लोकांना प्रेम आणि आशीर्वाद देण्याची विनंती पोस्टमधून केली आहे.
तिने पोस्टमध्ये लिहिले आहे- 'बेबी #Shreyaditya त्याच्या मार्गावर आहे! शिलादित्य आणि मी आपणा सर्वांना ही बातमी सांगताना आनंद होत आहे की, आमच्या आयुष्यातील नवीन अध्यायासाठी सुरूवात करत आहोत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हवेत.'
श्रेयाने ही बातमी शेअर केल्यानंतर, सिनेविश्वातून आणि चाहत्यांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. २०१५ मध्ये श्रेयाने तिचे बालपणीचा मित्र शिलादित्यशी लग्न केले होते. विवाह सोहळ्यात निवडक आणि जवळच्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. बंगाली पध्दतीने हा विवाह झाला होता.