पुढारी ऑनलाईन डेस्क - सलमान खानचा आज २७ डिसेंबर रोजी ५९ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसा दिवशी आगामी चित्रपट 'सिकंदर'चा टीजर रिलीज होणार होता. फॅन्स देखील प्रतीक्षा करत होते. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिकंदरचा टीजर उद्या रिलीज होणार असल्याचे घोषित केले होते. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याने सलमान खानने टीजर रिलीज डेट पुढे ढकललीय. सोबतच टीजर रिलीजची नवी तारीख आणि वेळ घोषित केली आहे.
सिकंदर टीजरची नवी रिलीज डेट पोस्टपोन केली आहे. २६ डिसेंबर रोजी रात्री मनमोहन सिंह यांचे निधन झाल्यानंतर हा निर्णय निर्मात्यांनी घेतला. एआर मुरुगादास दिग्दर्शित हा ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा टीजर आता २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी रिलीज होईल.
नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने X अकाऊंटवर स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, 'आमचे सन्मानित माजी पंतप्रधान मनमोहन सिंहडी यांच्या निधनाच्या कारणामुळे आम्हाला हे सांगताना खेद आहे की सिकंदर टीजरचा रिलीज २८ डिसेंबर सकाळी ११:०७ वाजेपर्यंत पोस्टपोन करण्यात आले आहे. या दु:खाच्या काळात आमच्या संवेदना देशासोबत आहेत. हे समदून घेण्यासाठी धन्यवाद.'
याआधी गुरुवारी या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये सलमान पॉवरफुल अंदाजात दिसत आहे.
सलमान खानसोबत रश्मिका मंदाना आणि काजल अग्रवाल दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २०२५ मध्ये ईदच्या निमित्ताने चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.