ऐश्वर्याला SIIMA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा क्रिटिक्स पुरस्कार मिळाला  x account
मनोरंजन

SIIMA 2024 | Aishwarya Rai ला मिळाला अभिनेत्रीचा पुरस्कार, भाषणाने जिंकली सर्वांची मने

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - दुबईमध्ये आयोजित SIIMA 2024 मध्ये ऐश्वर्या रायची चर्चा अधिक ठरली. तिने बेस्ट एक्ट्रेस क्रिटिक्स ॲवॉर्ड आपल्या नावे केला. पुरस्कार जिंकल्यानंतर तिने जे भाषण केलं, त्यामुळे ती चर्चेत आली.

'पोन्नियिन सेलवन: II' मध्ये दमदार भूमिकेसाठी ऐश्वर्या रायने SIIMA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा क्रिटिक्स पुरस्कार आपल्या नावे केला. तिने मणिरत्नम यांचा चित्रपट नंदिनीच्या रूपात आपल्या अभिनयाने लाखों प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यासाठीच हा पुरस्कार होता. या कार्यक्रमात ऐश्वर्या राय सोबत तिची मुलगी आराध्या बच्चनदेखील दिसली. तिचा अंदाज देखील कमालीचा होता. पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्या रायने एक विनिंग स्पीच देखील दिली. ते भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आराध्याने रेकॉर्ड केले ऐश्वर्याचे भाषण 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आराध्या तिची आई ऐश्वर्याचे फोटो क्लिक करताना दिसते. ऐश्वर्याचे भाषण देखील तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. याशिवाय, दोघी अभिनेता चियान विक्रमची भेट घेताना दिसतात. ऐश्वर्या-विक्रम यांना पोन्नियिन सेल्वन I आणि II मध्ये एकत्र अभिनय करताना पाहण्यात आले होते.

शिमरी ऑऊटफिटमध्ये ऐश्वर्या राय

अबू धाबीच्या यास आयलँडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमात आई आणि मुलीची जोडी शिमरी आऊटफिटमध्ये दिसली. ऐश्वर्याने ब्लॅक आणि गोल्ड गाऊन परिधान केला होता. तर आराध्या सिल्व्हर आणि ब्लॅक शिमरी आऊटफिटमध्ये दिसली. ऐश्वर्याने कार्यक्रम स्थळाबाहेर जमलेल्या फॅन्ससोबत सेल्फी देखील घेतला.

Video - Aishwarya Rai Adorer Arijit Bhattacharya x account वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT