Sidharth Malhotra Father Dies instagram
मनोरंजन

Sidharth Malhotra Father Death | सिद्धार्थला पितृशोक; 'तुम्ही कुठलीच अपेक्षा केली नाही', कियारा आडवाणीची भावूक पोस्ट

Sidharth Malhotra Father Death | सिद्धार्थला पितृशोक; 'तुम्ही खूप काही दिलं, बदल्यात तुम्ही कुठलीच अपेक्षा केली नाही', कियारा आडवाणीची भावूक पोस्ट

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांना पितृशोक झाला असून त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. या दुःखद प्रसंगी कियारा आडवाणीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत “तुम्ही खूप काही दिलं, बदल्यात काहीच अपेक्षा केली नाही” अशा शब्दांत सासऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

Sidharth Malhotra Father Death news

बॉलिवूड अभिनेता (Sidharth Malhotra)च्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान सिद्धार्थची पत्नी कियारा आडवाणीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केलीय. तिने आपल्या सासऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत लिहिले की, “तुम्ही आम्हाला खूप काही दिलं, पण बदल्यात कधीच काही अपेक्षा केली नाही.” (entertainment) सोबतच तिने फॅमिली फोटोदेखील शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे निधन झाले आहे. सिद्धार्थने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची पुष्टी केली. सुनील मल्होत्रा ​​यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. सोबतच त्याने वडिलांसाठी एक मोठा संदेश लिहिला आहे.

इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हणाली कियारा?

कियारा म्हणाली, ''सुरुवातीपासूनच त्यांनी मोठ्या मनाने, समजूतदारपणे आणि निःस्वार्थ प्रेमाने कुटुंबात स्वागत केले, ज्यामुळे सर्वांना एकत्र राहण्याची ताकद मिळाली. त्यांचा आपुलकीचा स्वभाव, दयाळूपणा आणि कुटुंबाप्रती असलेले निस्सीम प्रेम प्रत्येक कृतीतून जाणवत असे. ते नेहमी उपस्थित राहणारे, मनापासून ऐकणारे आणि छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवणारे होते.

त्यांनी आयुष्यभर मनापासून दिलं, पण बदल्यात कधीच काही अपेक्षा केली नाही. त्यांच्या गोष्टी, त्यांचे हास्य, शांत स्वभाव आणि कोमल हृदय कायम स्मरणात राहील. त्यांनी मागे कोमलता, प्रामाणिकपणा आणि अढळ प्रेमाची समृद्ध परंपरा ठेवली आहे, जी त्यांच्या मुलांमध्ये, नातवंडांमध्ये आणि त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकामध्ये जिवंत राहील.

शेवटी, त्यांना शांततेत विश्रांती लाभो अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. ते सदैव आठवणीत आणि प्रेमात राहतील''

सिद्धार्थ आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाला?

सिद्धार्थने पोस्टमध्ये वडिलांसोबतचे जुने फोटो शेअर करत पोस्टमध्ये म्हटलंय-'' ते प्रामाणिक, संस्कारांशी जोडलेले आणि आपल्या तत्त्वांवर ठाम राहणारे व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यभर आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. ते शिस्तप्रिय होते पण कठोर नव्हते; त्यांच्यात ताकद होती पण अहंकार नव्हता. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आणि आजारपण आले, तरीही त्यांनी सकारात्मकता आणि धैर्य कधी सोडले नाही. मर्चंट नेव्हीचे कॅप्टन म्हणून त्यांनी समुद्रावर नेतृत्व केले आणि आजाराशीही शांतपणे सामना केला. वडील शांत झोपेतून या जगाचा निरोप घेऊन गेले, पण त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही''

एका मुलाखतीत सिद्धार्थने म्हटले होते की, 'त्याचे वडील असली हिरो आहेत, माझे सर्वात प्रेमळ हिरो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT