Shweta Kawatra on casting couch  
मनोरंजन

Shweta Kawatra Casting Couch |'एका खोलीत बोलावलं, आता कपडे काढ', ऑडिशनच्या नावाखाली...अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Shweta Kawatra on Casting Couch 'चालून दाखव, आता कपडे काढ..', 'ऑडिशनच्या नावाखाली कपडे काढायला सांगितले'; अभिनेत्री श्वेता क्वात्राचा धक्कादायक अनुभव

स्वालिया न. शिकलगार

'कहानी घर घर की' आणि 'कुमकुम' या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता कवात्रा सध्या अभिनयापासून दूर असून दुबईत कुटुंबासोबत आयुष्याचा आनंद घेत आहे. मात्र अलीकडे एका पॉडकास्टमध्ये तिने मनोरंजन क्षेत्रातील स्वतःच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना कास्टिंग काउचचा अत्यंत अस्वस्थ करणारा अनुभव उघड केला.

श्वेताने सांगितले की, काही ऑफिसमध्ये तर ऑडिशनच्या नावाखाली बेड ठेवलेले असत. त्या काळात अशा गोष्टींचा अर्थही तिला समजत नव्हता आणि निष्पाप तसेच नवख्या कलाकारांची अडचण याचा काही लोक गैरफायदा घेत असत.

श्वेता क्वात्राने सांगितले की, एका ऑडिशनसाठी गेल्यानंतर तिला अभिनय किंवा संवाद न पाहता कपडे काढण्यास सांगण्यात आले. हा प्रकार ऐकून ती पूर्णपणे हादरली होती. तिने सांगितले की, अनेकदा तिला विचित्र आणि वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले. "तू कॉम्प्रोमाइज करशील का?" असा थेट प्रश्नही विचारला जात असे. सुरुवातीला या शब्दाचा नेमका अर्थही माहीत नव्हता. त्यानंतर समोरची माणसं चेहऱ्यावरून इशारे करत आणि त्यांचा हेतू लक्षात यावा अशी अपेक्षा ठेवत. अशा प्रसंगी एका मुलीच्या मनात किती भीती निर्माण होते, हे शब्दांत सांगता येणार नाही, असे ती म्हणाली.

तिने कास्टींग काउच बद्दल एक धक्कादायक अनुभव शेअऱ केला. ती म्हणाली, एकदा मला मोठ्या हॉटेलमध्ये ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. तिथे बऱ्याच मुली होत्या. त्यामुळे फारसे असुरक्षित वाटले नाही. पण यानंतर मला एका खोलीत बोलावण्यात आले. तिथे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, सगळेच होते. त्यांनी विचारले की मी स्क्रिप्ट वाचली आहे का. मी हो उत्तर दिलं. मग ते म्हणाले, 'आता थोडे चालून दाखव.' मी तेही केले. मग ते म्हणाले, 'ठीक आहे, आता तुझे कपडे काढ.'

ती म्हणाली, "मला वाटलं की, मी ऐकण्यात काहीतरी चूक केली आहे. मला विचित्र वाटत होतं. 'कपडे का काढत आहात?' ते म्हणाले, 'तू स्विमसूटमध्ये कशी दिसशील हे आम्हाला बघायचं आहे.' मी इतकी घाबरले होते.. त्या खोलीत मी एकटीच होते. मी फक्त 'धन्यवाद' म्हणाले आणि तिथून पळ काढला."

श्वेता कवात्राने अभिनेता मानव गोहिलसोबत विवाह केला आहे. 'कहानी घर घर की'च्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे त्यांनी लग्न केले. सध्या श्वेता अभिनयापासून दूर असून रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT