पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील एका खास परफॉर्मेंसचा किस्सा आपल्या शिवाने म्हणजेच पूर्वा कौशिकने सांगितला. मला या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली खूप भारी वाटलं. या सोहळ्यात शिवा म्हणून मला डान्स करण्याची संधी मिळाली आणि ते ही श्रेयस तळपदे यांच्यासोबत. मी लहान असताना त्यांचा इकबाल सिनेमा पहिला होता आणि त्यासोबत बरेच सिनेमे आणि मालिकाही पहिल्या आहेत. माझ्यासाठी ते मोठे सेलेब्रिटी आहेत, उत्तम कलाकार आहेत.
आम्ही २ वेळा टेक्निकल केली आणि मग वन टेक परफॉर्म केलं. एक किस्सा मला सांगायला आवडेल हे तर सर्वांना माहिती आहे की, श्रेयस यांनी पुष्पा फिल्मच्या हिंदी व्हर्जनमध्ये आपला आवाज दिला आहे. जेव्हा मी बॅक स्टेज श्रेयसला भेटले तेव्हा मी त्यांना शिवा म्हणून एक विनंती केली की, शिवाचा एक डायलॉग बोलाल का- "केसाला धक्का, कपाळाला बुक्का" आणि त्यांनी पुष्पांच्या आवाजात तो डायलॉग म्हणून दाखवला. जे मला इतकं भारी वाटलं.