श्रेया घोषालच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली. दोन जण बेशुद्ध पडले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
public pushing at Shrya Ghoshal live concert
मुंबई - ओडिशातील कटकमध्ये १३ डिसेंबर रोजी रात्री श्रेयाच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक परिस्थिती बिघडली. रात्री श्रेया घोषालच्या लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान जोरदार धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. श्रेया घोषालच्या कार्यक्रमात हलक्या लाठीचार्जमुळे गर्दीवर नियंत्रण आले. पण या गार्दीमुळे दोघे बेशुद्ध झाले.
कार्यक्रम सुरू होण्याआधी गर्दी अनियंत्रित होती. गायिकेला जवळून पाहण्यासाठी हजारो लोक स्टेजकडे धावले आणि बॅरिकेट्स तोडण्यात आले. यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. ७० पोलिस आणि २,१०० कर्मचारी असूनही इतकी गर्दी झाली की, पोलिसांना यावं लागलं. गुदमरल्यामुळे किमान दोघे बेशुद्ध पडले. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. कॉन्सर्टमध्ये अनियंत्रित गर्दी पाहून अतिरिक्त पोलिस आयुक्त, अनेक वरिष्ठ अधिकारी तत्काळ पोहोचले.
पहिल्यांदाच कटक गेली होती श्रेया
कटकच्या स्टेजवर श्रेयाने 'डोला रे डोला', 'चिकनी चमेली', 'मस्तानी हो गई', 'सैयारा तू तो बदला नहीं' आणि 'मनवा लागे' यासारखी हिट गाणी गायली. कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिने वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली.
यासाठी केलं होतं कार्यक्रमाचं आयोजन?
ओडिशाच्या समुद्री इतिहासाच्या स्मृतीसाठी ही बाली यात्रा काढली जाते. यावर्षी ५ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर पर्यंत ही यात्रा झाली.