पुढारी ऑनलाईन :
बॉलिवूडची उत्तम गायिका श्रेया घोषाल सध्या अडचणीत आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X हॅक झाले आहे. श्रेया हिने या विषयीची माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. १३ फेब्रुवारीपासून तीचे अकाउंट हॅक झाले आहे. तीने सांगितले की, खूप प्रयत्न करूनही ते अकाउंट पुन्हा सुरू झाले नाही.
इंस्टाग्रावर एक फोटो पोस्ट करत गायिकेने लिहिलंय की, माझे एक्स अकाउंट १३ फेब्रुवारीपासून हॅक झाले होते. मी एक्स टीमशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथून मला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मी माझे अकाउंट उघडू शकत आहे न डिलीट करू शकते.
श्रेया घोषाल पुढे म्हणाली, 'कृपया या अकाउंटवरून पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. या खात्यातून लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. हे सर्व फसवे दुवे आहेत. एकदा खाते दुरुस्त झाले की, मी तुम्हाला त्याबद्दल व्हिडिओद्वारे माहिती देईन.
श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायिकांपैकी एक आहे. तिने बॉलिवूडला 'चिकनी चमेली', 'मेरे ढोलना', 'तेरी यादों में', 'जलिमा', 'यिमी यिमी' आणि 'बरसो रे' अशी काही उत्तम गाणी दिली आहेत. श्रेया घोषालला तिच्या उत्कृष्ट कामासाठी पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.