shraddha kapoor shraddha kapoor
मनोरंजन

Shraddha Kapoor : श्रद्धाच्या मनमोहक मदमस्त नयनांनी केलं घायाळ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बोल्ड अभिनेत्रींच्या तुलनेत साधा पेहराव धारण करत लोकांमध्ये वावरणाऱ्या अभिनेत्री या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. मोकळे सोडलेले केस, कपाळावर टिकली, गळ्यात छानसा नेकलेस, पंजाबी ड्रेस किंवा साडीमध्ये जेव्हा या अभिनेत्री दिसतात, तेव्हा त्यांच्या अदा घायाळ करणाऱ्या असतात. थोडक्यात काय तर भारतीय वेषभूषेत बॉलीवूड अभिनेत्रींचं सौंदर्य आणखी उठून दिसतं. अभिनेत्री श्रद्धा कपूरला भारतीय वेशभूषेत पाहिल्यानंतर ही गोष्ट पुन्हा-पुन्हा सिद्ध होते.

श्रद्धाने कू या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर भारतीय वेषभूषेतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहणाऱ्याच्या तोंडून आपसूकच WOW!! अशी कमेंट निघते.

छान लिपस्टिक, कपाळावर बारीकशी टिकली आणि शोभतील असे इ्रअररिंग्ज घातलेल्या श्रद्धाने पीच कलरचा आधुनिक पद्धतीचा भारतीय ड्रेस परिधान केला आहे. वाऱ्यामुळे चेहऱ्यावर केसांचे येणारे बट्स तिच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. श्रद्धा मुळातच सुंदर आहे. सुंदर ड्रेस आणि लाईट मेकअपमुळे तिचं सौंदर्य खुलून येतं. श्रद्धाने केलेली ही पोस्ट तिच्या चाहत्यांना आवडली असून लाईक्स आणि कॉमेंटसचा पडणारा पाऊस त्याचीच ग्वाही देतात.

श्रद्धा कपूरने अभिनय आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी श्रद्धा तिच्या फोटोशूटमधून चाहत्यांना वेशभूषेतील नवे ट्रेंड दाखवण्याचा प्रयत्न करत असते. श्रद्धाने शुक्रवारी ठाण्यामध्ये झालेल्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिच्यासोबत मंचावर उपस्थित होते. यावेळी श्रद्धाने उत्तम मराठी बोलत गोविंदाशी संवाद साधला. तिचं अस्खलित मराठी ऐकून अनेकांना सुखद धक्का बसला होता. दहीहंडीच्या या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी श्रद्धाने विशेष वेशभूषा केली होती. या वेषभूषेतले फोटो तिने कू अॅपवर शेअर केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT