बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका हटके अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. श्रद्धा डिस्नेच्या झोटोपिया 2 च्या हिंदी भागाचा आवाज बनली आहे. ज्युडी होप्सच्या व्यक्तिरेखेला श्रद्धाचा आवाज लाभला आहे. अलीकडेच डिस्नेने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन श्रद्धाचा आणि ज्युडीचा एक फोटो शेयर केला आहे. (Latest Entertainment News)
आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, 'झोटोपीया 2 परिवारात दाखल होण्यासाठी खूप जास्त उत्साहित आहे. ज्युडी होप्सच्या आवाज बनून. ती साहसी आणि उत्साही आहे. प्रेमळ आहे. तुमच्यासाठी येत आहे एक अनोखे सरप्राइज!!! येत आहे झोटोपिया 2. थिएटरमध्ये 28 नोव्हेंबरला.’ श्रद्धाच्या या पोस्टवर तिच्यावर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मावशी पद्मिनी कोल्हापुरे या पोस्टच्या कमेंटमध्ये म्हणते, 'वाट पाहू शकत नाही ! तसेही तू आमच्या आयुष्यातील खरेखुरे कार्टून कॅरॅक्टर आहेस.’
बॉलीवूड प्रोजेक्टबाबत बोलायचे झाल्यास श्रद्धा कपूर आगामी स्त्री 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 2027 मध्ये रिलीज होणार आहे. मडॉक हॉरर युनिव्हर्समधील स्त्री फ्रँचाईजीमधील हा तिसरा सिनेमा आहे. याशिवाय नगिन या फॅंटसी ट्रायोलॉजीमध्येही ती दिसणार आहे. याशिवाय ती प्रसिद्ध लावणी नर्तिका विठाबाई नारायणगांवकरच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ‘विठा' असे या बायोपिकचे नाव आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलकारांमध्ये विठाबाई यांचे नाव आदराने घेतले जाते. विठाच्या शूटिंगला 1 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.