पुढारी ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला इंडस्ट्रीमध्ये डान्सिंग क्वीन म्हणूनही ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी टेरेंस लुईससोबत तिचा एक उत्कृष्ट डान्स व्हिडिओ समोर आला होता, जो इंटरनेटवर खूप व्हायरल झाला. यानंतर तिने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फनी बिकिनी लूकमध्ये दिसली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अधिक वाचा : अक्षय कुमार भिडणार कंगणाला! 'सूर्यवंशी' गांधी जयंतीदिवशी होणार रिलीज
व्हिडिओ नोरा फतेहीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नोरा अतिशय मजेदार स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की नोरा आधी पिंक कलरच्या जॅकेटवर दिसते आणि त्यानंतर अचानक ती त्याच जॅकेटवर काळ्या रंगाची बिकिनी परिधान करते. यासह तिने डोळ्यावर चष्मा देखील ठेवला आहे. या व्हिडिओसह तिने 'स्वतःला बिकिनीमध्ये दाखवत आहे' असं कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अधिक वाचा : सिमरन कौरचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ
तिचा हा गमतीदार व्हिडिओ पाहून चाहते हसण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीत. व्हिडिओवर चाहतेही बर्याच मजेदार कमेंट्स देत आहेत, एका चाहत्याने हा काही जोक आहे का? असे लिहिले आहे तर दुसर्याने लिहिले आहे या शेवटाचा विचार केला नव्हता.
अधिक वाचा : रम्य समुद्रकिनारी जान्हवी झाली बोल्ड, पण तो 'मिस्ट्री मॅन' कोण?
नोराचा हा व्हिडिओ आतापर्यंत ६२ लाख जणांनी व्हिडिओ पाहिला आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नोरा लवकरच अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाकडून नोरा फतेहीच्या चाहत्यांना मोठ्या आशा आहेत.