पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिवलिका ओबेरॉयचे ( Shivaleeka Oberoi ) शुभमंगल नुकतेच झाले आहे. ती आपला बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिषेक पाठकसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. गोव्यात त्यांचे लग्न झाले. लग्नाला अभिषेक आणि शिवालिका यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने हजेरी लावली होती. न्यूली मॅरिड कपलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
शिवलिका ओबेरॉयने ( Shivaleeka Oberoi ) 'ये साली आशिकी' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय ती 'खुदा हाफिज' आणि 'खुदा हाफि-२' मध्ये झळकली आहे. 'खुदा हाफिज' चित्रपट अभिषेक पाठकने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्याुदो सेटवरच अभिषेक आणि शिवालिकाची भेट झाली. त्यानंतर अभिषेकने टर्कीमध्ये शिवालिकाला प्रपोज केले होते.
अभिषेक पाठकने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजय देवगण स्टारर 'दृश्यम २' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २४० कोटींहून अधिक कमाई केली आहे. लग्नासाठी अभिषेकने पांढऱ्या रंगाची डिझायनर शेरवानी तर शिवालिकाने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. अभिषेक व शिवालिकाने लग्नगाठ बांधत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कलाविश्वातील सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.