पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येकाच्या हृदयात नृत्याला विशेष स्थान आहे. काहींसाठी हा काही कॅलरीज बर्न करण्याचा एक मार्ग आहे तर काहींसाठी हा एक व्यवसाय आहे आणि काहींसाठी हा फक्त एन्जॉय करण्याचा एक मार्ग आहे. अभिनेत्री- उद्योजक-आई असलेली शिल्पा शेट्टीसाठी हे नृत्य हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त, शिल्पाने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे आणि नेटकरी तिच्या तिच्या नृत्याच्या प्रेमात पडले आहेत. (World Dance Day)
तिने तिच्या सोशल मीडियावर कॅप्शनसह एक व्हिडिओ शेअर केला आहे, " I Strongly Believe In the law of ??????????????Do You ? (World Dance Day)
अभिनेत्रीने एक सुंदर कुर्ता घालून ती शाहरुख खानसोबतच्या बाजीगर चित्रपटातील तिच्या आवडत्या आणि बॉलीवूड 'किताबें बहुत सी या' क्लासिक्सपैकी असलेल्या गाण्यावर तिने नृत्य केले आहे. याआधी, इंटरनॅशनल डान्स डेच्या अगोदर, अभिनेत्रीने तिच्या आवडत्या ट्रॅकवर वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता.
तिच्या काही सुपरहिट गाण्यांमध्ये शट अप अँड बाउन्स, चुराके दिल मेरा, मैं आयी हूं यूपी बिहार लूटने, बरस जा, आयला रे लडकी मस्त मस्त तू यांचा समावेश आहे.
शिल्पा शेट्टी सुखीमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. त्यानंतर रोहित शेट्टी दिग्दर्शित भारतीय पोलीस दल या चित्रपटात दिसणार आहे.