मनोरंजन

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने केली तिचे रेस्टॉरंट बंद करण्याची घोषणा; पती राज कुंद्राच्या या कारणांमुळे करावे लागले बंद? जाणून घ्या

पोस्टमध्ये शिल्पाने हे रेस्टॉरंट बंद होण्याचे कारण सांगितलेले नाही

अमृता चौगुले

शिल्पा शेट्टीने तिचे लोकप्रिय रेस्टॉरंट बॅस्टीयन बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. एक सोशल मीडिया पोस्ट करत तिने ही बातमी शेयर केली आहे. मुंबईतील बांद्रा भागात तिने हे रेस्टॉरंट आहे. ती लिहिते, ‘या गुरुवारी एका युगाचा अंत होईल. जेव्हा आम्ही मुंबईतील सगळ्यात आयकॉनिक डेस्टीनेशन्समधील बॅस्टीयन बांद्रा ला निरोप देत आहोत. ही ती जागा आहे जिथे अनेक आठवणी, अविस्मरणीय रात्री आणि असे अनेक क्षण दिले जिथे मुंबईच्या नाइट लाईफला आकार दिला. आता ही जागा शेवटच्या टप्प्यावर आली आहे.’

या सर्वोत्तम जागेचा सन्मान करण्यासाठी आम्ही सगळ्यात जवळच्या व्यक्तींसाठी खास संध्याकाळचे आयोजन केले आहे. एक रात्र जी जुन्या आठवणी, उत्साह आणि अविस्मरणीय असेल. जिथे बॅस्टीयनच्या प्रत्येक गोष्टीचे सेलिब्रेशन होईल. जेव्हा आपण बॅस्टियन बांद्राला निरोप देऊ, तेव्हा आपल्या गुरुवार रात्रीचा खास आर्केन अफेअर इव्हेंट पुढच्या आठवड्यात बॅस्टियन ॲट द टॉपमध्ये सुरू राहील, जिथे हा वारसा एका नवीन अध्यायासोबत आणि नवीन अनुभवांसोबत पुढे जाईल.’

या पोस्टमध्ये शिल्पाने हे रेस्टॉरंट बंद होण्याचे कारण सांगितलेले नाही. शिल्पाने 2016 मध्ये रणजीत बिंदरा याच्यासोबत रेस्टॉरंटची सुरुवात केली. ही जागा मुंबई नाईटलाईफमध्ये खूप लोकप्रिय आहे.

फसवणुकीचा किस्सा समोर

ऑगस्टमध्ये उद्योगपती दीपक कोठारीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर 60 कोटीच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. शिल्पा आणि राज बेस्ट डील टीव्हीचे डायरेक्टर होते.

यादरम्यान दीपककडून शिल्पाच्या कंपनीने कर्ज घेतले. पण ही रक्कम टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक म्हणून दाखवली. पैसे परत मागितल्यावर या दोघांनी टाळाटाळ केली. पण अचानक शिल्पाने या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिल्पाच्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT